स्री मुक्तीच्या जाहीरनामा डॉ. बाबासाहेबांच्या संविधानात आहे.डॉ.मिलिंद बागुल
![]()


स्री मुक्तीच्या जाहीरनामा डॉ. बाबासाहेबांच्या संविधानात आहे.
डॉ.मिलिंद बागुल
भारतीय इतिहासातल्या काळवंडलेल्या व अनिष्ट अशा प्रथा, रुढी, परंपरा यांनी वेढलेल्या समाज व्यवस्थेला एक नवा आयाम देण्यात आणि इतिहास बदलविण्याचे सामर्थ्य भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून, भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले दिसून येते त्यांनी दिलेला विचार हा प्रत्येक स्त्रीने अंगी कारल्यास या देशाचे भविष्य आणि भवितव्य उज्वल असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी पौर्णिमा फाउंडेशनने आयोजित केलेल्या महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. सुरेखा पालवे तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ.सत्यजित साळवे, पोर्णिमा फाउंडेशनच्या अध्यक्ष शालिनी बिऱ्हाडे या विचार मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. सत्यजित साळवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार आणि परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून दिलेली ऊर्जा ही आपल्या जीवनाला नवा विचार देत असते आणि या विचारांवर आपली दिशा निश्चित करण्याचे सामर्थ्य आपल्यात येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा पालवे यांनी महिलांनी आपलं आत्मभान जपत आपल्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी दिशा देणारे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिलेले असून आपल्या जगण्याची उर्मी अर्थात पुरोगामी विचारात असून त्यासाठी आपण शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील त्यांनी या प्रसंगी मांडले.
जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात आज चित्रकला, निबंध,गायन, नृत्य तसेच सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार अतिथीच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वनकर यांनी तर आभार प्रज्ञा तायडे यांनी मानले.

