शैक्षणिक, सामाजिकउपक्रम घेणे हेच खरे महामानवांना अभिवादन-मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे प्रतिपादन,अमळनेर येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न
![]()
शैक्षणिक, सामाजिक
उपक्रम घेणे हेच खरे महामानवांना अभिवादन
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे प्रतिपादन
अमळनेर येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न


अमळनेर प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त अमळनेर येथील इंदिरा गांधी भवन येथे खुली सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद आणि डॉ.आंबेडकर अध्ययन केंद्र यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील 140 जणांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष व नगरसेवक श्री नरेंद्र रामभाऊ संदानशिव हे सुद्धा उपस्थित होते. श्री.तुषार नेरकर साहेबांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व सांगितले की हा उपक्रम एक आदर्श उपक्रम आहे. असा उपक्रम घेणे हेच खरे महामानवांना अभिवादन आहे असे ते याप्रसंगी बोलले.
या कार्यक्रमाला ज्यांनी मोलाचे योगदान दिले ते DX काँम्पुटर चे संचालक गोपीचंद चव्हाण सर यांनी त्यांच्या डीएक्स कम्प्युटर मार्फत या स्पर्धेसाठी एकूण चार बक्षीस जाहीर केलेले आहेत त्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास त्याचबरोबर द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात येईल तसेच साक्षी ट्रेडर्स चे संचालक श्री ज्ञानेश्वर संदानशिव यांच्यामार्फत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख एक हजार रुपये व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक साठी श्री. गोकुळ बिऱ्हाडे यांच्याकडून 751 रुपयांचे रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे
तसेच तृतीय बक्षीस श्री सतीश सोनवणे यांच्यामार्फत 501 रुपये रोख व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे*. *स्पर्धेचा निकाल उद्या जाहीर होईल व सर्व विजेत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे होणाऱ्या फुले भीम गीतांचा कार्यक्रमात बक्षीस व सहभागी ना प्रमाणपत्र वितरण होणार आहे .सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल.
याप्रसंगी प्राध्यापक लीलाधर पाटील यांच्याकडून अल्पोपहार व पाण्याची सोय करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वी तिचा करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे अध्यक्ष श्री राहुल रामभाऊ संदानशिव, प्रा विजयकुमार वाघमारे, नितीन रतन संदानशिव प्रा.कृष्णा ,रोहिदास संदानशिव व श्री जितेंद्र अनिल संदानशिव यांनी या स्पर्धेचे यशस्वी ते करिता मेहनत घेतली.
याप्रसंगी श्री.सोमचंद संदानशिव श्री.अविनाश संदानशिव श्री.विनोद बिऱ्हाडे,समाधान बिऱ्हाडे,अभिषेक संदानशिव. राजू संदनशिव अशोक बिऱ्हाडे,योगेश बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे व आमचे डिजिटल पार्टनर एन आर एस टेक्नोसोल्युशन्स या सह इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते

