1 min read

समायोजन न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना मूळ आस्थापनेवर रुजू करा.प्रोटान संघटनेची मागणी

Loading

समायोजन न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना मूळ आस्थापनेवर रुजू करा.प्रोटान संघटनेची मागणी
जळगाव:- दि १२ एप्रिल २०२४ प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान) कडे आनंदी बाई बंकट मुलांचे हायस्कुल चाळीसगाव येथील अतिरिक्त उपशिक्षक साहेबराव बुधा साळुंखे यांनी तक्रार केली असून श्री साहेबराव साळुंखे यांना सण २०२२-२३ च्या संच मान्यते नुसार त्यांच्या शाळेने अतिरिक्त ठरविले होते. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण कुवर यांनी त्यांना शिवाजी माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.दे.ता. चाळीसगाव ही शाळा दिली होती,परंतु शिवाजी माध्यमिक विद्यालयाने साहेबराव साळुंखे यांना रुजू करून घेतले नाही.तसेच अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकां पैकी जिल्ह्यातील ४२ शिक्षकांना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिलेल्या शाळांनी हजर न केल्याने त्या शिक्षकांना मूळ आस्थापने वर हजर करून घेण्याचे व नियमित वेतन काढण्याचे आदेश तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केल्याने ४२ अतिरिक्त शिक्षकां पैकी ४१ शिक्षकांना मूळ आस्थापनेवर हजर करून घेण्यात आलेले असले ,तरी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुल चाळीसगाव यांनी त्यांच्या शाळेतून अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकास मूळ आस्थापने वर अद्याप हजर न केल्याने.
अतिरिक्त शिक्षक साहेबराव बुध साळुंखे यांनी शिक्षण विभागातील माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव व शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या कडे तक्रार केल्याने त्यांनी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुल चाळीसगाव येथील मुख्याध्यापक यांना साळुंखे यांना मूळ आस्थापनावर हजर करून घेण्या संदर्भात लेखी स्वरूपाचे आदेश करून सुद्धा हजर करून न घेतल्याने शिक्षकाच्या वेतनाचा व उपस्थिती संदर्भातील प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिरिक्त शिक्षक साहेबराव साळुंखे यांनी प्रोटान संघटने कडे न्यायाच्या मागणी करिता केलेल्या तक्रारीनुसार संघटनेचे पदाधिकारी दि १२/४/२०२४ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण या त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसल्याने तसेच दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी अथवा कार्यालयीन प्रमुख नसल्याने प्रोटान संघटनेचे म.रा.उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी मोबाईल वर चर्चा करून टपालात निवेदन दिले.प्रोटान संघटनेने निवेदनात म्हटले आहे की जो वर अतिरिक्त शिक्षक साळुंखे यांना मूळ आस्थापनेवर हजर केले जाणार नाही तोवर मुख्याध्यापक यांचे वेतन रोखण्यात यावे तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी रुजू करण्याचे आदेश दिल्यावर सबंधीतास रुजू न केल्याने व लेखी आदेशाला केराची टिपली दाखविल्याने शिक्षण कायद्यानुसार मुख्याध्यापक यांच्या वर शिस्त भांगची कार्यवाई व्हावी.माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुल येथील मुख्याध्यापक यांच्यावर कार्यवाई न केल्यास प्रोटान संघटना शिक्षणाधिकारी कार्यालया समोर कार्यकर्त्या सह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करले.असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देण्यासाठी प्रोटान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव, महासचिव मिलिंद निकम,म.रा.उपाध्यक्ष तथा लेखक गणेश काकडे, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेंड युनियनचे विभागीय उपाध्यक्ष विक्रम सोनवणे,तसेच आनंद जाधव,गजाजन सुरवाडे,अमोल बाविस्कर,दिलीप मोरे,किशोर भामरे,भरत रेशवाल, बापू हसबन,संदीप ठोसरे साहेबराव साळुंखे ,रवींद्र गायकवाड,हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *