1 min read

“मतदार जागृतीसाठी जि प शाळेचे विद्यार्थी जिवंत करणार माझ्या मामाचे हरविलेले पत्र “मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम

Loading

” मतदार जागृतीसाठी जि प शाळेचे विद्यार्थी जिवंत करणार माझ्या मामाचे हरविलेले पत्र “
मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम
दि १३ , पारोळा
देशाच्या होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ” मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो ” हे ध्येय मनाशी ठेवुन जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळाचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी मतदार जागृतीसाठी जि प प्राथ शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन माझ्या मामाचे पत्र हरविल ते पुन्हा जिंवत करून म्हणजे पोस्ट कार्डाचा उपयोग करून मतदार जागृती केली जाणार आहे .
निवडणुका कोणत्याही असोत . मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये उदासिनता दिसुन येते . साधारण ५० % सुद्धा मतदान होत नाही . असे न करता संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने वापरला पाहिजे .
स्वतःसह कुटुंब , परिसर , गांव व नातेवाईक यांनाही मतदानासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रोत्साहित केले पाहिजे .
याच प्रयत्नाचा भाग म्हणुन .पारोळा केंद्र समुहातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना आपल्या नातेवाईकांना पोस्ट कार्ड म्हणजे पत्र लेखन करून टाकण्याच्या उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली .
पारोळा केंद्राची शाळाप्रवेशोत्सव सहविचार व प्रशिक्षण सभा जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळा येथे प्रशिक्षण समन्वयक तथा केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख पाहुणे व प्रशासकिय मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती . यात सुलभक म्हणुन बोदर्डे शाळा मुख्याध्यापिका सुषमा पाटील व शाळा क्र २ पारोळा उपशिक्षिका मंगला पाटील ह्या होत्या . यावेळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते . या प्रसंगी शाळा क्र ३ पारोळाचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांसाठी पत्र लेखन करण्यासाठी ११११ पोस्ट कार्ड वाटप केले .
सध्या अनेक वर्षापासुन सोशल मिडीयाच्या या जगात पोस्ट कार्ड पाठविणे हा प्रकार काळाच्या पडदया आड गेला आहे . या पिढीतील अनेक बालक व तरुणांनी पत्र हा .प्रकार साधा बघितलेला सुद्धा नाही . विदयार्थ्यांना पोस्ट कार्डाचा परिचय , ते नातेवाईकांना संदेश देण्यासाठी लेखन करण्याचा अनुभव व त्यातुन साधला जाणारा परिणाम याचा परिचय व्हावा या साठीही उपक्रमाची सुरुवात करण्यात आली . आपल्या नातेवाईक बालकाने स्वःहस्ते लेखन केलेले दुर्मिळ झालेले पत्र नागरिकांना प्राप्त झाल्यावर निश्चितच त्यांना याचे अप्रुप व आनंद वाटणार आहे . त्यातुन ते उत्साहाने स्व:तासह इतरांबरोबर मतदान प्रक्रियेत सहभागी होतील व मतदान व मतदार जागृतीसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम समोर येतील . हा उपक्रम आपआपल्या शाळेवर विदयार्थ्यांच्या सहभागातून यशस्वीरित्या राबविण्याचे अश्वासन सर्व शाळा मुख्याध्यापक व शिक्षक बंधु बघिनींनी दिले .
या उपक्रमाचे गशिअ विश्वासराव पाटील व शिविअ चंद्रकांत चौधरी यांनी खुप कौतुक केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *