1 min read

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व नैसर्गिक आपत्तीचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश-ना.अनिल पाटील यांचे आदेश

Loading

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व नैसर्गिक आपत्तीचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश-ना.अनिल पाटील यांचे आदेश

अमळनेर प्रतिनिधी
मागील आठवडाभर अमळनेर तालुका तसेच जळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा बंद झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून काही गुरे दगावली आहेत.
या आपत्तीची तात्काळ दखल घेत महसूल, कृषी व विद्युत मंडळाला लवकरात लवकर पंचनामे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अस्मानी संकटात राज्यसरकार व मदत व पुनर्वसन विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल.ना.अनिल भाईदास पाटील मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *