अमळनेर तालुक्यात वादळीवारासह गारांचा पाऊस,मोठ्या प्रमाणात नुकसान
![]()


अमळनेर तालुक्यात वादळीवारासह गारांचा पाऊस
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यात अवकाळी पाऊस पडला.. वादळीवारासह गारांचा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले.शेतकऱ्यांचे दादर,गहु,हरबरा, मका,व चाराचे व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
कळमसरे येथे विज कोसळल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला..तर तालुक्यातील काही ठिकाणी विज पडली व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशी चर्चा आहे..
वादळी वारामुळे शहरातील भाजीपाला मार्केट मध्ये व्यापारी बांधवांची धांदल उडाली व भाजीपाला चे नुकसान झाले..
वादळ जोराने असल्याने काही शेतकरी बांधवांचे पत्तर उडाली तर झाडांच्या फांद्या तुटल्या.. अगोदरच शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झाला…
वादळी वारामुळे ग्रामीण भागात जास्त नुकसान-वादळी वारामुळे ग्रामीण भागातील छत,पत्रा उडाला तर काही डेरेदार वृक्ष पडली असून काही शाळांचे पत्रा उडाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..
वादळी वारामुळे पोल पडल्याने बत्ती गुल
विजेचे पोल वादळी वारामुळे पडल्याने विज नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागेल की काय?असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. विज कर्मचारी लवकरच विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत..


