ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करून हमीभाव द्या….,किसान काग्रेंसच्या वतीने जिल्हाधिकारीयांच्याकडे मागणी
![]()



ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करून हमीभाव द्या….किसान काग्रेंसच्या वतीने जिल्हाधिकारी
यांच्याकडे मागणी
अमळनेर प्रतिनिधी- आताच्या रब्बी हंगामात कधी नव्हे ते उत्कृष्ट व भरघोस ज्वारी चे उत्पन्न आमच्या अमळनेर तालुक्यात आले आहे. आमच्या मायबाप शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून अनेक अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देऊन ज्वारी पिकवली. असे असतांनाही अजूनही शासकीय स्तरावर ज्वारी ची खरेदी सुरू झालेली नाही. व त्यामुळे शेतकऱ्याला पडेल दरात नाईलाजाने आपला माल हमीभावापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे.मार्केट मध्ये मिळत असलेला भाव व हमीभाव यात जवळपास १०००रू.चा फरक असून हा आमच्यावर मोठा अन्याय असून आपण यात लक्ष घालून लवकरात लवकर शासकीय खरेदी सुरू करून आमची कष्टाने पिकवली ज्वारी हमीभावाने खरेदी करावी ही विनंती.
तसेच या मार्च अखेर शेतकऱ्यांनी आपली पीक कर्जाची रक्कम जमा केलेली असून अजूनही शेतकऱ्यांना परत पीक कर्ज मिळाले नाही. वि. का. सो.चे सचिव देखील संपावर आहेत. शेतकरी कसेतरी करून पैसे जमा करून कर्ज भरतो. परंतु ते वेळेवर परत न मिळाल्यास प्रचंड अडचणी शेतकर्याला निर्माण होतात. त्यामुळे आपण यात लक्ष घालून लवकरात लवकर पीक कर्ज वाटपाची व्यवस्था करण्यास जिल्हा बँकेस आदेश द्यावेत ही विनंती.
वरील विनंत्या मान्य करून आपण शेतकऱ्यास न्याय द्यावा ही विनंती.
अन्यथा आम्ही किसान काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन करून शासनाला जाग आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू.
कृपया शेतकरी हितासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी
दिनेश पवार तालुकाध्यक्ष, किसान काँग्रेस अमळनेर,प्रा.सुभाष पाटील
जिल्हा कार्याध्यक्ष किसान काँग्रेस जळगाव,सुरेश पाटील जिल्हाध्यक्ष
किसान काँग्रेस जळगाव,डॉ.अनिल शिंदे
संचालक कृ. उ. बा. अमळनेर यांनी निवेदनाद्वारे केली आहे…

