उत्तर पश्चिम मतदार संघातील उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा नैतिक अधिकार माझा नाही-गजानन कीर्तिकर
![]()

उत्तर पश्चिम मतदार संघातील
उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा
नैतिक अधिकार माझा नाही. गजानन कीर्तिकर
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातील उमेदवाराकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची महाविकास आघाडी कडून घोषणा करण्यात आली. अमोल कीर्तिकर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत व खासदार गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबांचे एक विश्वासू शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेस मध्ये बंड केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना युती धर्म पाळता येत नाही असा आरोप संजय निरुपम यांनी केला.अमोल कीर्तिकर यांची खिचडी घोटाळाप्रकरणी चौकशी चालू आहे अशा उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही असे सांगितले. काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करून संजय निरुपम यांना पक्षातून बडतर्फ केले तर खासदार गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्या प्रती संवेदना व्यक्त केली. अमोल कीर्तिकर यांच्यावरील आरोपामुळे ते व्यथीत झाल्याचे पत्रकारांना जाणवले. पक्ष श्रेष्ठींचा आदेश म्हणून काय भूमिका घेतात हे लवकरच कळेल. उत्तम पश्चिम मतदार संघातून माझा मुलगा अमोल कीर्तिकर निवडणूक लढवत असल्याने येथील शिवसेना उमेदवार कोणता असावा हे ठरवण्याचा नैतिक अधिकार माझा नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले. अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीत नाहक तेच तेच कागदपत्रे व प्रश्न विचारुन केंद्रीय यंत्रणा राबवत असल्याचे त्यांनी सांगितले

