राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जातीच्या तालुकाध्यक्षपदी एस. सी. तेले
![]()

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जातीच्या तालुकाध्यक्षपदी एस. सी. तेले
अमळनेर (प्रतिनिधी):-
येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट )पार्टीच्या भटक्या विमुक्त जातीच्या तालुकाध्यक्षपदी एस. सी. तेले यांची नियुक्ती करण्यात आली. एस.सी.तेले यांना महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भागवत पाटील ,मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत, नगरसेवक रवी पाटील ,मा.कृ.उ.बा समिती संचालक एल .टी. पाटील ,कृ .उ .बा. समिती संचालक समाधान भाऊ धनगर ,नगरसेवक राजेश पाटील, मा .राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळू पाटील,गौरव पाटील,कल्पेश साळुंखे, गोविंदा बाविस्कर,उमेश पवार,रोहित तेले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

