अमळनेरला बसस्थानक समोर वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने पाणपोईचे उद्घाटन
![]()



अमळनेरला बसस्थानक समोर वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने पाणपोईचे उद्घाटन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
उन्हाळा सुरू झाला की येणाऱ्या, जाणाऱ्याची तहान भागविण्यासाठी काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करत असे; परंतु सध्याच्या काळात पाण्याचा व्यवसाय सुरू झाला असून, आता पाणपोईऐवजी रस्त्यालगत प्रत्येक ठिकाणी बाटलीबंद पाणी विकत मिळू लागल्याने बाटलीबंदच्या जमान्यात पाणपोई हरवली आहे. त्यामुळे मातीपासून बनविलेले रांजण, माठ लुप्त होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत. परंतु याला अपवाद आहेत युवा सामाजिक कार्यकर्ता पवन चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षापासून अमळनेर बसस्थानकासमोर पाणपोईची व्यवस्था केलेली आहे…
अमळनेर येथील बस स्थानकाजवळील हॉटेल संजय बिअर बार चे मालक मा. नगरसेवक स्व. बाबासो संजय चौधरी यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आज दुपारी एकच्या सुमारास पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.व अन्नदाणाचा कार्यक्रम करण्यात आला त्यांचे पूत्र हॉटेल संजय चे संचालक पवनभाऊ चौधरी व नंदु चौधरी हे सलग दहा वर्षांपासून हा समाजपयोगी उपक्रम राबवत आहेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात पादचारी तसेच प्रवासी यांना याचा लाभ होतो. उद्घाटनप्रसंगी मित्र परिवार उपस्थित होता…
यांची होती उपस्थिती
पवन संजय चौधरी, नंदु चौधरी, संतोष पाटील, मयूर चौधरी, संजय पाटील, दादू चौधरी, शैलेश बागुल, गिरीश चौधरी, नरेश पैलवान, सुभाष पाटील सुनिल चौधरी, दत्तू लांडगे, बाळू महाजन, गुलाब पाटील, समाधान पाटील, ख़ुशी वानखेड़े, प्रशांत शेटे, गोविंदा महाजन इत्यादी मित्र परिवार उपस्थित होता…

