1 min read

जळगांव जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी महेश दगडु पाटील यांची नियुक्ती

Loading

जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी महेश दगडु पाटील यांची नियुक्ती

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मौजे कामतवाडी ता. अमळनेर येथील युवक महेश दगडु पाटील स्थापत्य अभियंता (BE Civil) यांची अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्य व संघटन कौशल्याची दखल घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी एहसान खान , प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, उत्तर महाराष्ट्र समन्वयक किरण पाटील, जळगाव जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी आनंद पुरोहित यांनी दिनांक 24 मार्च 2024 रोजी जळगाव जिल्हा काँग्रेस भवन येथे जिल्ह्य़ातील युवकांच्या बैठकीत चाचपणी व मुलाखती घेऊन वरिष्ठांकडे अहवाल सादर करून वरीष्ठ माननीय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू, सहप्रभारी रोहित कुमार, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मा.राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेसाहेब, देशाच्या नेत्या त्यागमुर्ती सोनियाजी गांधी, देशाचे नेते माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा. राहुलजी गांधीसाहेब, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरू जी , युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी . व्ही. जी , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या परवानगीने दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले.

नियुक्ती आदेश आल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष प्रशांत ओगले, उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, प्रदेश महासचिव दिपाली ससाणे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मिडीया प्रभारी मा. झीनत शबरीन, सोशल मिडीया काॅन्ह्वेनर दुर्गेश पांडे, प्रदेश महासचिव राहुल माणिक, प्रदेश महासचिव किरण पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रसारमाध्यम प्रमुख अक्षय जैन, प्रदेश सचिव आशुतोष पवार, प्रदेश सचिव तुषार संदानशिव, प्रदेश सचिव शोएब पटेल , विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, प्रदेश सचिव सुहास दाभाडे , जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी आनंद पुरोहित,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस हेमंत तात्या ओगले ,जळगाव जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गोकुळ बोरसे, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. के . डी .पाटील, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा मा. सुलोचना ताई वाघ, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष बी. के . सुर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील, मा. नगरसेवक शाम पाटील, प्रविण पाटील, रवि पाटील , युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कौस्तुभ पाटील, शहराध्यक्ष अझहर सय्यद आदी पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन पर शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती देऊन पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थकी लावून पक्षसंघटना बळकट करून सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू व भाजपच्या खोट्या प्रचारामुळे काँग्रेस पक्ष आणि लोकांमधील वाढलेला दुरावा कमी करू असे आश्वासन महेश पाटील यांनी दिले. काँग्रेसचा जाहीरनाम्यात समावेश असलेल्या पाच न्याय गॅरंटी प्रत्येक घरापर्यंत युवक काँग्रेस पोहोचवणार असेही यावेळेस महेश पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *