1 min read

“स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडा” –

Loading

“स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडा” –

करिअर तज्ज्ञ संतोष पवार .
नोबेल फाउंडेशन तर्फे करिअर महासेमिनार संपन्न

जळगांव प्रतिनिधी – “तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात करिअर निवडा म्हणजे यश नक्की मिळेल” असा सल्ला मुंबई येथील करिअर तज्ञ संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. नोबेल फाउंडेशन आणि रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित दहावीनंतरचे करिअर या महासेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मुंबई येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस चे डॉ.विकास गीते,आपण फाउंडेशनचे मनोज गोविंदवार ,रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हर्षाली कोल्हे, नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील ,राजेंद्र पाटील,देवल पाटील मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना संतोष पवार पुढे
म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे.स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला सक्षम बनवा. बुद्धिमत्तेला मेहनतीची जोड दिली तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. संघर्ष आणि संकटे ही मोठे करिअर घडवण्यासाठी आवश्यक इंधन असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ विकास गीते म्हणाले की, संशोधन क्षेत्रात भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपयोगामुळे मूलभूत संशोधनाची जगाला आवश्यकता आहे. विज्ञान क्षेत्रात करिअर करत असाल तर विज्ञानाला मानवतेची जोड द्या.देशाला शास्त्रज्ञांची गरज आहे असेही ते म्हणाले. प्रसिद्ध समुपदेशक व लेखक मनोज गोविंदवार म्हणाले की, भावनिक बुद्धिमत्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक करिअर बाबतीत असतो. तुमचा छंद आणि करियर जेव्हा एक होतात तेव्हा आनंदी आयुष्य जगता येते. जीवनात स्वतःचा शोध घेणे आणि समाधानी आयुष्य जगणे म्हणजे यश होय पालकांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मुलांची सतत चर्चा करा व मैत्रीपूर्ण संबंध ठेवा असेही ते म्हणाले. नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना आयआयटी,नीट,एनडीए या करिअर बाबत मार्गदर्शन केले तसेच पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय देवरे यांनी केले तर आभार विवेक साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजगार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

फोटो कॅप्शन – विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुंबई येथील करिअर तज्ज्ञ संतोष पवार, मनोज गोविंदवार, डॉ विकास गीते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *