क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरी करावी – भिमराव महाजन
![]()

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरी करावी – भिमराव महाजन
अमळनेर येथे समता परिषदेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन
अमळनेर/ प्रतिनिधी
महिला शिक्षणाचे आद्यजनक, शेतकऱ्यांचे कैवारी, दिन दलितांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती गुरुवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते, राज्याचे कॅबिनेटमंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ठीकठिकाणी, गावा-गावात, घरा- घरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन यांनी केले आहे.

