विद्यमान खासदार मा. उन्मेष पाटील व पारोळा येथील माजी नगरअध्यक्ष मा.करण पवार मित्र परीवार यांचा ठाकरे गटात प्रवेश
![]()
विद्यमान खासदार मा. उन्मेष पाटील व पारोळा येथील माजी नगरअध्यक्ष मा.करण पवार मित्र परीवार यांचा ठाकरे गटात प्रवेश
उदधव ठाकरे गटाकडून करण पवार यांना खासदारकीचे तिकीट घोषित..

करण पवार यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक पाठीशी उभे राहणार..
जळगांव प्रतिनिधी
विद्यमान खासदार मा. उन्मेष पाटील व पारोळा येथील माजी नगरअध्यक्ष मा.करण पवार तसेच तरुण चेहरा यास मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जळगाव लोकसभा मतदार संघ यातून उमेदवारी निश्चित केली असून त्यांचा दि 3/4/24 रोजी मातोश्री या निवास्थानी जाहीर प्रवेश केला.भाजप पक्षाने निष्ठावानाना डावलने, अपणास्पद वागणूक देणे, भ्रष्टाचारी यांना अभय देने ह्या सर्व बाबींचा पाढा वाचत ह्या दोघे युवानी भाजपला सोढचिट्ठी दिली. तरी मा.संजय सावंत साहेब (संम्पर्क प्रमुख जळगाव जिल्हा)मा. विष्णु भंगाळे (जिल्हा प्रमुख, जळगाव ) अमळनेर येथील मा. ललिताताई पाटील श्री. विजय काशिनाथ पाटील (उपजिल्हा समन्वय) व अनंत निकम (उपशहर प्रमुख, अमळनेर )यांनी मुंबई मातोश्री येथे जाऊन त्यांचे जाहीर स्वागत केले व येणाऱ्या निवडणुकीत मा. करण पवार यांना निवडून आणण्याचा निच्छय केला.
यावेळी ठाकरे गटामध्ये अनेक तरुणांनी प्रवेश केला. करण पवार यांना निवडून आणण्यासाठी सर्व इंडिया आघाडीतले पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत..

