1 min read

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित विधान भवनात डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले अभिवादन

Loading

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित विधान भवनात डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले अभिवादन

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज बुधवार, दिनांक ०३ एप्रिल, २०२४ रोजी विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा.उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) श्री.जितेंद्र भोळे व सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, उप सचिव श्री.राजेश तारवी, श्रीमती पूनम ढगे, अवर सचिव श्री.विजय कोमटवार, श्री. मोहन काकड, अवर सचिव (समिती) श्री.सुरेश मोगल, मा.उप सभापती यांचे खाजगी सचिव श्री.रविंद्र खेबुडकर, तसेच विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, डॉ संतोष उडतेवार संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. श्री.निलेश मदाने, विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.प्रदिप चव्हाण यांच्यासह विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळयास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *