1 min read

मतदान हे तर आपले राष्ट्रीय कर्तव्य-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन

Loading

मतदान हे तर आपले राष्ट्रीय कर्तव्य-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन

अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या अमळनेर शहरातील विविध पदाधिकारी व संघटना यांची बैठक संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक सज्ञान नागरीकाने भारतीय संविधानाने मतदानाचा समान हक्क प्रदान केला आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपला वाटा उचलायला हवा त्याप्रमाणेच मतदानाबाबत लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करण्यासाठी शासकीय स्तरावर व्यापक प्रयत्न होईल, व मतदान जागृती बाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जावा.. 03 जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत 015 अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या अमळनेर शहरातील विविध असोसीएशन व संघटना यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची नगरपरिषदेतील महात्मा फुले सभागृहातील बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले..
आज दिनांक 31-03-2024 दुपारी 5.00 वा. मिटींग हॉल नगरपरिषद अमळनेर येथे 03 जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत 015 अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या अमळनेर शहरातील विविध असोसीएशन व संघटना यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व संघटना यांनी 100% मतदान करावे व आपल्या संघटनांचे पदाधिकारी, त्यांचा परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. सदर बैठकीस रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर, प्रशांत धमके निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *