1 min read

ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी येथे मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून बागल जे.व्ही.यांची वर्णी.

Loading

ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी येथे मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून बागल जे.व्ही.यांची वर्णी.

अमळनेर प्रतिनिधी
ग्राम विकास शिक्षण संस्था मुडीच्या मासिक सभेत श्री.. बागल जिजाबराव विठ्ठल यांची मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून संस्थापदाधिकारी याच्या कडून सर्वानुमते निवड करण्यात आली.
संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी असलेले श्री. दिपक चंदन पाटील हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने व ते कायम सेवेत नसाल्याने त्यांची मुख्याध्यापक प्रतिनिधीची जागा रिक्त होती. सदर रिक्त जागेवर झेड. डी. सोनवणे हायस्कुल मुडी येथील मुख्याध्यापक श्री. जिजाबराव विठ्ठल बागल यांची संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणुन सर्वानुमते निवड केली.
श्री. बागल यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष:- उदय पाटील, प्रा.ऑ. सेक्रेटरी भरत पाटील, कायम संचालक रमेश पाटील, संचालक:– सुनिल पाटील, शिवाजीराव पाटील, डॉ. अशोक पाटील, श्रीमती.पुष्पलता पाटील, राजेश पाटील, प्रविण काटे, या सर्वांनी अभिनंदन केले.
श्री. बागल जे. व्ही. यांच्या मुख्याध्यापक प्रतिनिधी निवडीबद्दल संस्थेतिल सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *