1 min read

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृती प्रभात फेरी.

Loading

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृती प्रभात फेरी.

जळगाव: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने समाजात मतदान जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका तथा बी.एल.ओ.पर्यवेक्षिका श्रीमती. प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनात आज सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रभात फेरी ए.टी झांबरे विद्यालय- मू.जे.महाविद्यालय- प्रभात चौफुली रस्ता- श्यामसुंदर कॉलनी-ए.टी.झांबरे विद्यालय अशा मार्गाने काढण्यात आली होती. यामध्ये सुमारे 340 विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सहभाग होता. याप्रसंगी सहाय्यक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी डॉ.अतुल इंगळे व प्रा.राहुल वराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे,बीएलओ सर्वश्री.महेंद्र नेमाडे, डी.ए. पाटील,विजय पाटील, योगेश पवार,पराग राणे, आर.एन.तडवी, वेदप्रकाश गर्गे यांचेसह शिक्षक वृंद श्री.बिपिन झोपे, सुचिता बाविस्कर, हेमलता भोळे, जया राणे, भक्ती बर्वे, चेतना राणे व संजना शिवरामे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *