1 min read

मनोज जरांगे पाटील यांनी उमाकांत शिवाजी पाटील यांचा भगवा रुमाल व फुलहार टाकून केला सत्कार

Loading

मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांनी उमाकांत शिवाजी पाटील यांचा भगवा रुमाल व फुलहार टाकून सत्कार ,,,,,,,,,,,,,,,,, .

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेलटी या छोट्याशा खेडेगावातील सामाजिक कार्यकर्ते व उत्तर महाराष्ट्रातील एक निस्वार्थ समाजसेवा करणारा एक समाजसेवक उमाकांत शिवाजी पाटील. यांनी केलेलं आदिवासी, दलित, राजपूत, कुणबी, मराठा, भोई,कोळी,मातंग, माळी, धनगर,यासह हिंदू व मुस्लिम अनेक समाजातील लोकांसाठी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची काळजी न करता वेळेवर दवाखान्यात घेऊन जात त्यांचा जीव वाचविण्यासाठी मदत केली.आदिवासी मनोरुग्ण महिला पुरुष यांना देखील मदत केली तसेच रस्त्यावर अपघात समय केलेली मदत त्यांची खरच उल्लेखनीय आहे ते स्वतः पेशंटला घेऊन दवाखान्यात पोहोचवतात व स्वतः पेशंटचे नातेवाईक येत नाही तोपर्यंत तेथे थांबून उपचार दवाखान्यात डॉक्टरांकडून करून घेतात वेळ प्रसंगी आपल्या खिशातून पैसेही गोरगरीब जनतेसाठी खर्च करतात तर काही पेशंटला पुढील उपचारासाठी मुंबईपर्यंत स्वतः पेशंट सोबत जाऊन उपचार करून घेतात रुग्णांसाठी ते स्वतः मुंबईला पेशंट सोबत जाऊन ऍडमिट करतात हे सर्व केलेलं कामाच कौतुक केले व सत्कार मराठा समाजाचे नेते संघर्ष योध्दा श्री मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या राहत्या गावी अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे फुलहार व भगवा रुमाल टाकून सत्कार केला व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
चौकट,,,,,,,,,
मी एक सर्वसामान्य परिवारातील सामान्य कार्यकर्ता असून मला बालवयापासूनच सर्वसामान्य लोकांची मदत करणे व त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे हा माझ्या वडिलांपासून मिळालेले पाठबळ त्याच्यामुळे मी गोरगरीब जनतेसाठी धावुन जातो मराठा नेते जरागे पाटील यांनी केलेला हा सन्मान माझा नवे तर माझ्या माझ्यावर प्रेम करणारे गोरगरीब जनतेचा आहे
उमाकांत पाटील सामाजिक कार्यकर्ता सेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार,,,,,,,,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *