लढाव्वे शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांचा आमदार रोहित पवार यांनी केला सत्कार
![]()

लढाव्वे शेतकरी नेते
प्रा. सुभाष पाटील यांचा सत्कार
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमी रस्त्यावर उतरणारे व त्यांना न्याय मिळेपर्यंत शासनाशी भांडणारे लढव्वे नेते प्रा.सुभाष पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याची नुकतीच दखल आमदार रोहित पवार यांनी घेतली. प्राध्यापक सुभाष पाटील यांनी अमळनेर तालुका दुष्काळ घोषित व्हावा यासाठी आंदोलने केली.. शेतकऱ्यांना पिक विमा मिळवण्यासाठी राज्याच्या उपराजधानीत आंदोलन करत त्यांना न्याय मिळवून दिला.. तालुक्यात शेतकऱ्यांसाठी ते नेहमीच एक मार्गदर्शक म्हणून व समस्यां सोडण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात..
सविस्तर माहिती अशी कि अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी लढणारे लढवय नेते प्राध्यापक सुभाष पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करतांना
आमदार रोहित पवार,आमदार सुनील भुसारा यांनी आज विशेष सत्कार केला. यावेळी मा.आमदार डॉ बी.एस.पाटील,
काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डाँ अनिल शिंदे,जेष्ठ काग्रेस नेते धनगर दला पाटील, प्रा अशोक पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्य महिला प्रमुख तिलोत्तमा पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या महिला प्रमुख ललिताताई पाटील,
मा.नगरसेवक शामभाऊ पाटील, नगरसेवक,रियाझ दादा,शेख सर,गौतम मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,दिनेश पवार, के डी पाटील,बी के सूर्यवंशी उपस्थित होते.

