जिल्हा ग्रंथालय अधिकारीपदी सुनील जगताप यांच्या पदोन्नती बद्दल सानेगुरुजी ग्रंथालयाच्या वतीने सत्कार
![]()


सुनील जगताप यांच्या पदोन्नती बद्दल
सत्कार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक व आपले अमळनेर येथिल रहिवासी,तसेच आपल्याला ग्रंथालयीन कामकाजात नेहमीच मार्गदर्शन करणारे सुनिल जगताप यांची जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदी पदोन्नती होऊन नासिक येथे नियुक्ती आदेश मिळाले. त्यांचा सत्कार नुकताच पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने करण्यात आला..
सुनील जगताप यांचा सत्कार शाल,पुस्तक, सानेगुरुजी यांची प्रतिमा सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर,जेष्ट संचालक पी.एन भादलीकर,दिपक वाल्हे,व सानेगुरुजी वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना सुनील जगताप यांनी वाचनालयाच्या संचालक मंडळाचे धन्यवाद व्यक्त करीत मी नेहमीच वाचनालयाच्या चांगल्या उपक्रमासाठी सदैव मी मदत करेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले. तर आभार दिपक वाल्हे यांनी मानले..

