विलासराव पाटील यांनी राहुलजी गांधी यांना ओबीसी जातीनिहाय जन गणना संबधी स्व लिखित पुस्तिका दिली भेट
![]()

विलासराव पाटील यांनी राहुलजी गांधी यांना ओबीसी जातीनिहाय जन गणना संबधी स्व लिखित पुस्तिका दिली भेट
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक १३ मार्च रोजी “भारत जोडो-न्याय यात्रा” धुळे शहरात आगमन वेळी काँग्रेस नेते व खासदार माननीय राहुलजी गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले आमदार श्री. कुणाल बाबा पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष-श्याम भाऊ सनेर यांचे सह माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांचे भारत जोडो न्याय यात्रेचे म. प्र. काँग्रस ओ बी सी सेल चे पदाधिकारी श्री विलासराव पाटील सर यांनी धुळे शहरात आगमन प्रसंगी श्री राहुलजी गांधी यांना ओबीसी जातीनिहाय जन गणना संबधी स्व लिखित पुस्तिका भेट देऊन, हस्तांदोलन करून स्वागत केले. यावेळी विविध काँग्रेस सेल चे तथा सम विचारी विवीध शिक्षक मुख्याध्यापक संघटनचे अध्यक्ष, पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थीत होते,तसेच सातपुडा शिक्षण संस्थे चे मुख्य प्रवेशद्वार समोर संस्था पदाधिकारी, काँग्रेस नेते, कार्यकर्ते, तसेच परिसरातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोषात स्वागत केले.

