1 min read

विप्रो तील महिला कर्मचाऱ्यांनी केला उत्साहात महिला दिन साजरा

Loading

विप्रो तील महिला कर्मचाऱ्यांनी केला उत्साहात महिला दिन साजरा

अमळनेर प्रतिनिधी
आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विप्रोत पॅकिंग विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी फॅक्टरी व आधार संस्था अमळनेर तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते फॅक्टरी मॅनेजर विजय बाग जीवाला यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच चेतन थोरात एच आर मॅनेजर ,जे वी सर, सुधीर बडगुजर वेल्फेअर ऑफिसर यांनी देखील महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी महिलांना स्तन कर्करोग व गर्भाशयाच्या कर्करोग विषयी तसेच स्वतःची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील यांनी या वर्षाची महिला दिवसाची थीम’ स्वतःवर थोडे जास्त प्रेम करूया’ याविषयी माहिती दिली आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी , सतत कार्यरत राहण्यासाठी आपण स्वतःची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद व समुपदेशक ज्ञानेश्वरी पाटील यांनी महिला सहाय्यकक्षा विषयी माहिती सांगितली,आधार संस्थेच्या अश्विनी भदाणे, दीप्ती शिरसाट, नंदिनी मैराळे व सुषमा वाघ यांनी महिलांसोबत विविध खेळ घेतले त्याद्वारे महिलांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले व धमाल केली कंपनीकडून सर्व उपस्थित महिलांना गिफ्ट देण्यात आले उपस्थित महिलांनी कंपनीत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले.अशा रीतीने कार्यक्रम संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *