1 min read

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्थपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका : अधिवेशन अध्यक्षा वंदनाताई वनकर[ सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगावला उत्साहात संपन्न ]

Loading

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्थपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका : अधिवेशन अध्यक्षा वंदनाताई वनकर
[ सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगावला उत्साहात संपन्न ]

(जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी विजय लुल्हे सर यांच्याकडून सविस्तर बातमी)
‘ स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्तपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका आहे.प्रबोधन शिबिरांपेक्षा धार्मिक उत्सव जास्त उत्साहाने होतात हे बहुजन समाजाचे सर्वार्थाने सामाजिक आणि सांस्कृतिक पतन आहे.’असे मार्मिक प्रतिपादन अधिवेशनाच्या अध्यक्षा वंदनाताई वनकर ( संयोजिका,सत्यशोधक समाज महिला संघ,महाराष्ट्र ) यांनी मार्गदर्शनात केले.सत्यशोधक महिला संघ आयोजित पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशन नायगाव (ता.खंडाळा,जि.सातारा ) येथे रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी जि.प.प्राथमिक शाळे समोरील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभामंडपात प्रचंड उत्साहात संपन्न झाले.उद्घाटन सत्रात सार्वजनिक सत्यधर्म विचारमंचावर स्वागताध्यक्षा शुभांगीताई नेवसे ( माजी सभापती,पं.स.खंडाळा ), प्रमुख अतिथी म्हणून वैशाली पतंगे (अति.आयुक्त वस्तू व सेवा कर,पुणे ),स्वाती कोरी ( नगराध्यक्ष,गडहिंग्लज ),मंजिरी घाडगे ( प्रदेशाध्यक्ष,महिला आघाडी अ.भा.म.फुले समता परिषद ),आनंदी अवघडे (सातारा ),डॉ.कुंदाताई धुळे (भुलतज्ञ,छत्रपती संभाजीनगर ),मीनाक्षी कुंभार ( जयसिंगपुर ),जयश्रीताई लोंढे (राज्य कार्यकारणी सदस्य,ईब्टा शिक्षक संघटना,श्रीगोंदा ) मान्यवर उपस्थित होते.मार्गदर्शनात प्रमुख अतिथी वैशाली पतंगे म्हणाल्या की,’ स्रिया स्वतंत्र झाल्या परंतू त्यांना आजही प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य नाही ; स्त्रियांनी संविधान वाचावे म्हणजे त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व निश्चित निर्भयतेसह वाढेल ‘ यानंतर सर्व मान्यवर प्रमुख अतिथींनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.प्रमुख वक्त्या दर्शना पवार (अमळनेर ) मार्गदर्शनात म्हणाल्या की,’ स्री ही फक्त लैंगिक समाधान देण्याचे साधन व जन्म देणारी मादी नाही.स्त्रियांचे संसारातील निःस्वार्थी व समर्पित योगदान स्वीकारायला शिका त्याचे अनमोल मूल्य समजून घ्या आणि तिचा सन्मान करा.’ वक्त्या स्मिता पानसरे ( अध्यक्षा,भारतीय महिला फेडरेशन,महाराष्ट्र राज्य ),सुजाता गुरव (अध्यक्ष,सत्यशोधक ओबीसी परिषद – महिला ), झेबुन्निसा शेख ( प्रणेत्या,जबरन ज्योत शेतकरी संघटना,नागपूर ),ॲडव्होकेट वासंती नलावडे ( जिजाऊ सन्मान समिती,पुणे ) यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन माधुरी खैरनार प्रास्ताविक अर्चना तांबे आभार प्रदर्शन अनुरीता झगडे यांनी केले.अधिवेशनाचे उद्घाटन साधनाताई नेवसे (सरपंच,नायगाव ) यांच्या हस्ते सत्यशोधक समाजाच्या झेंडावंदनाने झाले.तत्पूर्वी सावित्री माई यांच्या स्मारकाला जाऊन मान्यवरांनी अभिवादन केले.क्रांतीमशाल साधनाताई नेवसे यांनी प्रज्वलित केली त्याप्रसंगी स्वागताध्यक्षा शुभांगी नेवसे (माजी सभापती पं.स. खंडाळा ) यांसह कार्याध्यक्षा रुपाली इंगोले (उद्योजिका,पुणे ),अर्चना खैरनार,संयोजिका उज्ज्वला तांबे ( शिरवळ ),राज्य अध्यक्ष अरविंद खैरनार ,राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांसह मान्यवर उपस्थित होते. परिवर्तनवादी समस्त सत्यशोधकांचा जयघोष करीत अभिवादन रॅली संमेलन स्थळी विसर्जित झाली. ७०० सावित्रीमाईंच्या लेकी अभिवादन रॅलीत सहभागी झाल्याने रॅली अभूतपूर्व झाली.त्यानंतर ह.भ.प.विजय महाराज भोईर ( शिरूर ) यांचे सत्यशोधकीय कीर्तन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभा मंडपात झाले.’ प्राचीन भारताची क्रांतिकारी महिला कालांतराने गुलाम का झाली ? ‘ गटचर्चा सत्र झाले.अध्यक्षस्थानी ॲड.वैशाली डोळस ( सुप्रसिद्ध वक्त्या, छत्रपती संभाजी नगर ) होत्या.गटचर्चेत विशेष निमंत्रित निता नेवसे ( माजी नगराध्यक्षा,फलटण ),सविता फाळके (माजी सभापती,न.प.सातारा ),सुनंदा जाधव (अध्यक्षा,सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समिती आदर्की,फलटण ),संगीता सूर्यवंशी ( आगारप्रमुख,रा.प.छत्रपती संभाजी नगर ),गायत्री इरले (जिल्हाध्यक्षा,अ.भा.माळी महासंघ,गोंदिया ),लता खाडे ( अध्यक्षा,सावित्री ज्योती वैश्विक विचारपीठ ),सुनिता माळी ( संचालिका,राष्ट्रीय श्रमिक सहकारी संघ मर्यादित दिल्ली, धुळे ),वैष्णवी राऊत ( श्री.संत शिरोमणी सावता माळी समाज मंडळ,महाड ),संगीता वसमाने (अध्यक्षा,मातंग समाज,शिरोळ ) विचारमंचावर उपस्थित होते.गट चर्चेचे समुह भगिनी प्रमुखांनी चर्चेचा अहवाल संक्षेपाने सादर केला.गट चर्चेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ॲडव्होकेट वैशाली डोळस म्हणाल्या की,’ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती झाली पण तुमच्या आमच्या डोक्यातील मनुस्मृति अजून जळाली नाही.तुमच्या आमच्या प्रश्नांची उत्तरे महादेव आणि बालाजीच्या मंदिरात नाही तर तुमच्या आमच्या प्रश्नांची उत्तरे सत्यशोधकांच्या साहित्यात,भारतीय संविधानात, संत तुकारामांच्या गाथेत,शिवरायांच्या स्वराज्यात आणि बुद्धांच्या विचारात आहे.’ चर्चेचे सूत्रसंचालन प्रतिभा महाजन प्रास्ताविक रिंपल जाधव आणि आभार कुमारी श्वेता शिंदे यांनी मानले.
पुस्तक प्रकाशन
क्रियाशील कार्यकर्ता पी.डी.पाटील सर ( धरणगाव ) लिखित ‘आदर्श महामाता ‘ पुस्तकाचे प्रकाशन वैशाली ताई पतंगे (अति.आयुक्त वस्तू व सेवा कर,पुणे ) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पी.डी.पाटील म्हणाले की,’ सावित्रीबाईंच्या माहेरी माझे पहिले पुस्तक प्रकाशित होणे माझे परमभाग्य आहे यातून मला सत्यशोधक समाजाचे कार्य करण्यासाठी अक्षय ऊर्जा मिळाली.सत्यशोधक समाज संघाचे दीपस्तंभ अनंतवासी हरी नरके लिखित आणि नागनालंदा प्रकाशित ‘ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘ या पुस्तकाच्या तेराव्या आवृत्तीचे प्रकाशन तसेच विधीकर्ते रघुनाथ ढोक लिखित सत्यशोधक विवाह विधी हे तेलगू व मराठी भाषेतील पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. [ *अधिवेशनाची क्षणचित्रे सत्यशोधकीय झेंडारोहण व अभिवादनाने अधिवेशनाचे उद्घाटन * स्मारक ते सभास्थळ भव्य अभिवादन रॅलीत तब्बल ५०० भगिनींचा उत्फूर्त सहभाग * सत्यधर्म गीतगायन व जिजाऊ वंदन * सावित्रीमाईंच्या लेकींनी तळभंडार उचलल्याने सभा मंडपात पसरले मांगल्य * विशेष निमंत्रितांचा भावपूर्ण सत्कार * ग्रामपंचायत नायगाव तर्फे अधिवेशनाध्यक्षा वंदनाताई वनकर यांचा सरपंच साधनाताई नेवसे यांच्या तर्फे भावस्पर्शी सत्कार * अधिवेशनात एकूण १,२५,००० रुपयांची ग्रंथविक्री * ‘आदर्श महामाता ‘ पी.डी.पाटील लिखित चरीत्र पुस्तिकेची निम्मी आवृत्ती ( ५०० ) सप्रेम भेट घेणाऱ्यांच्या उदंड प्रतिसादामुळे हातोहात संपली ! * संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांनी तब्बल आठवडाभर नायगाव परिसर स्थानिक कार्यकर्त्यांसह पिंजून काढल्याने माता भगिनींच्या अद्भुत प्रतिसादाने अधिवेशन झाले अद्भुत ! * संस्थापक राज्य सचिव डॉ.सुरेश यांची लाभली समर्थ साथ ]
फुले दाम्पत्याच्या प्रतिमा मोफत देऊन अजित जाधव यांनी केले अभूतपूर्व स्वागत
सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समिती व महात्मा फुले विचार अभियान सातारा यांच्याकडून अजितकुमार जाधव ( खंडाळा ) यांनी मा.फुले दाम्पत्याच्या तब्बल १००० प्रतिमा मोफत देऊन अधिवेशनार्थी फुले प्रेमींचे अभूतपूर्व स्वागत केले.


अधिवेशनात एकमताने संमत झालेले महत्वपूर्ण ठराव
भविष्यात जर कुणी फुले दांपत्य,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील तसेच बहुजन महापुरुष यांचे बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यास कायदेशीर कडक शासन व्हावे.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले – ३ जानेवारी व महात्मा ज्योतिराव फुले – ११ एप्रिल त्यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी.
सावित्रीमाई फुले,महात्मा जोतिराव फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,राजमाता जिजाऊ भोसले,अहिल्यामाई होळकर,फातिमा बी,मुक्ता साळवे,माता रमाई आंबेडकर या सर्वांचे चरित्र इयत्ता चौथी ते दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावे.यासह एकूण ७ महत्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.संमेलन पूर्व रात्री शनिवार दि.९ मार्च रोजी खंडाळा येथील विराज लॉन्स येथे ‘ मी सावित्री बोलतेयं ‘ हा वैशाली धाकुलकर (अमरावती ) यांचा एकपात्री प्रयोग झाला.
अधिवेशनासाठी मान्यवरांची विशेष उपस्थिती :- क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या वंशज मा.मालतीताई डोंगरे व प्रा. डॉ.नुतन लोणकर , डॉ.छाया पोवार,विधीकर्ते रघुनाथ ढोक ( पुणे ),अनिता देवतकर व भाऊसाहेब जाधव ( छत्रपती संभाजीनगर )
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी अमूल्य सहकार्य देणारे कार्यकर्ते व संस्था: – भैरवनाथ शिक्षण संस्था (नायगाव ), सरपंच साधनाताई नेवसे व ग्रामपंयायत सदस्य ,खंडाळा अन् शिरवळ महात्मा फुले व सावित्रीमाईंची ध्येयवेडी लेकरं ,कार्याध्यक्षा रूपालीताई इंगोले,हेमलता भालेराव ( पुणे ),उत्तरेश्वर मोहोळकर ,ॲडव्होकेट संभाजीराव बोरूळे,गिरीष बनकर ( फलटण ),प्रा.दत्ताजी जाधव ( सातारा ) संजीवनी जाधव (नाशिक ),कैलास महाजन ( रायगड ),अर्चनाताई खैरनार,शिवमती जज्ज्वलाताई तांबे, संगिता खोबरे ( औरंगाबाद ),संजय बाबा करपे,अजीत जाधव,संतोष तांबे,रामचंद्र भागवत,विधिकर्ता साळूबा पांडव,विधीकर्ते भगवान रोकडे,प्रसिद्धी समितीचे पत्रकार विजय लुल्हे (जळगाव ) व लेखक पी.डी.पाटील सर (धरणगाव ),कैलास जाधव,उमेश उबाळे,विधीकर्ता शिवदास महाजन व कविराज पाटील (एरंडोल ) यांचे अमूल्य सहकार्य मिळाले.अधिवेशनास आसवली, ओतूर,पुणे, हडपसर,बारामती मुंबई,कल्याण,नागपूर,सातारा,अमरावती,यवतमाळ,फलटण,महाड,भंडारा,परभणी,पार्टस,दौंड,इचलकरंजी,जळगाव,धुळे ,चाळीसगाव,धरणगाव,एरंडोल ,नंदुरबार ,आदर्कीसह महाराष्ट्रातून विशेषतः सपतीक जोडीने व एकल सुमारे १५०० महिला व ४०० पुरुष फुले प्रेमीजनांची उत्साहपूर्वक उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *