आगामी पोलीस भरतीसाठी 16मार्च पासून सदरक्षण मोफत पोलीस भरती प्रशिक्षण.
![]()
आगामी पोलीस भरतीसाठी 16मार्च पासून सदरक्षण मोफत पोलीस भरती प्रशिक्षण.
50 युवक युवतींना मिळणार मोफत प्रशिक्षण

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – शासनातर्फे नुकतीच बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. 17441 पोलीस शिपाई व इतर पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे या भरती प्रक्रियेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली आहे खानदेशातील तरुणांना या पोलीस भरती प्रक्रियेसाठी जळगाव येथे नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र तर्फे सदरक्षण मोफत पोलीस भरती प्रशिक्षण संपन्न होणार आहे.यासाठीची विनामूल्य निवड प्रक्रिया दिनांक 16 व 17 मार्च 2024 रोजी सकाळी दहा वाजता नोबेल फाउंडेशन प्रगती विद्यामंदिर समोर ख्वाजामिया दर्गा जळगाव येथे संपन्न होणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम पुढील दोन महिने राबविण्यात येणार आहे यात महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा परीक्षा तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या योजनेअंतर्गत 50 उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेसाठी मैदानी सराव तसेच लेखी परीक्षेचे मार्गदर्शन मिळणार आहे .गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तके तसेच मैदानी सरावासाठी बूट व तत्सम साहित्याचे सुद्धा उपलब्धता करून देण्यात येणार आहे. तरी ग्रामीण व शहरी भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नोबेल फाउंडेशनचे संचालक राजेंद्र पाटील यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वयक अक्षय देवरे 9175548089 येथे संपर्क साधावा अशी माहिती जयदीप पाटील यांनी दिली.

