जळगाव शिंपी समाज हितवर्धक संस्था आयोजित एसपीएल सिजन 3 चा उत्साहात समारोप
![]()
जळगाव शिंपी समाज हितवर्धक संस्था आयोजित एसपीएल सिजन 3 चा उत्साहात समारोप.
क्रिकेटच्या माध्यमातून स्त्री – पुरुष समानतेचा संदेश समाजाला दिला व यातून युवकांचे संघटन कौशल्य साधता येईल : मा.आ. सुरेश भोळे

एस पी एल सिजन ४ चा उत्कृष्ट खेळाडूसाठी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप तर्फे पॅशन प्रो. बाईक बक्षीस देण्यात येईल:डॉ. मनिलाल शिंपी.
जळगाव ( प्रतिनिधी ) श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळातर्फे आयोजित”शिंपी प्रीमियर लीग सीजन थ्री” चा भव्य दिव्य असा समारोप कार्यक्रम साजरा
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित
युवक मंडळातर्फे दिनांक 7 ते 10 मार्च रोजी मानराज पार्क, जळगाव येथे शिंपी प्रीमियर लीग सीजन 3 चे भव्य आयोजक करण्यात आलेले होते.
सीजन थ्री चा शिंपी डायनामाईट हा संघ विजेता ठरलेला आहे याचे संघमालक संदीप सोनवणे व कर्णधार विकी जगताप व प्रतिनिधित्व सुमित अहिरराव यांनी केले होते.
या रोमांचित स्पर्धेत एकूण 14 पुरुष टिमांनी व महिलांचे तीन संघाचा सहभाग घेतला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरून मालेगाव, धुळे, चोपडा ,मुंबई, पुणे दोंडाईचा, अशा टीमचा समावेश होता
क्रिकेट खेळाच्या माध्यमातून स्त्री – पुरुष समानतेचा संदेश समस्त समाजाला देणारा ठरलेला असून याद्वारे समाज संघटन व भावी क्रिकेट प्लेयर आपल्या मिळेल व उत्कृष्ट नियोजन युवक मंडळाने केलेले आहे असे मा.आ सुरेश भोळे (राजु मामा) यांनी कार्यक्रमा प्रसंगी केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष-
राजेंद्रकुमार सोनवणे व संस्था उपाध्यक्ष-विवेक जगताप हे होते प्रमुख अतिथी शिंपी समाज जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी विश्वस्त पी. टी. शिंपी ,अ.भा.युवक अध्यक्ष रूपेश बागुल,जिल्हा युवक अध्यक्ष तुषार शिंपी एरंडोल मुख्य चषक प्रायोजक प्रमोद शिंपी, मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,तथा आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल शिंपी व संजय कापुरे यांनी महिला क्रिकेट संघाचा स्पर्धांचे पंच म्हणून काम करत, महिला खेळाडूंना क्षेत्ररक्षण बाबत विशेष मार्गदर्शन केले. सुप्रीम जनरल मॅनेजर रविकिरणजी कोंबडे माजी नगरसेवक आबा कापसे संस्था सचिव अनिल खैरनार ,प्रदीप शिंपी, मनोज भंडारकर, सुरेश सोनवणे उमेश शिंपी गणेश सोनवणे हे होते कार्यक्रम यशस्वी ते साठी शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी SPL प्रमुख सुमित अहिरराव, युवक सचिव हेमंत शिंपी एस पी एल कोषाध्यक्ष योगेश दगडू शिंपी, त्याचबरोबर आयोजक टीम मधून गणेश सोनवणे, अमित मुळतकर, निलेश शिंदे यशवंत शिंपी महेश शिंपी, विशाल देवरे, निलेश चव्हाण, सागर शिंपी (चार्ली) धर्मेंद्र जगताप हर्षल बोरसे, हर्षल शिंपी, उल्हास देवरे, सागर देवरे, ऋषिकेश शिंपी ,अशोक सोनवणे,सर्पमित्र दर्शन देवरे यांचाध सर्व हितचिंतक समाज बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण स्पर्धेत सूत्रसंचलन सचिन जाधव यांनी केले उपस्थित सर्व मान्यवर,खेळाडू, प्रायोजक आणि प्रेक्षक बंधू भगिनींचे योगेश शिंपी यांनी आभार व्यक्त केले.

