1 min read

विद्यार्थी गुणवत्ता विकासा सोबतच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार.

Loading

विद्यार्थी गुणवत्ता विकासा सोबतच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे सत्कार प्रसंगी प्रतीपादन

जळगांव प्रतिनिधी
माध्यमिक शाळांमधील गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेत आपला जिल्हा गुणवत्तेच्या संदर्भात अग्रेसर कसा राहील याकडे लक्ष देत विद्यार्थी व्यक्तिमत्व आणि गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत सोबतच शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मत नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांनी सत्यशोधकी साहित्य परिषद व शिक्षक संघटनेच्या वतीने केल्या गेलेल्या स्वागताप्रसंगी व्यक्त केले. चर्चेप्रसंगी त्यांनी आपल्याl जिल्ह्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा आणि त्यासोबतच स्कॉलरशिप व गुणवत्ता शिष्यवृत्ती अंतर्गत ज्ञानसंपन्न घडविण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेतच त्यात अधिकाधिक प्रगती कशी साधता येईल यासाठी प्रयत्न करून शिक्षकांशी सुसंवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत प्रलंबित प्रश्नांच्या साठी शासन स्तरावर प्रयत्न करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी मत व्यक्त केले . याप्रसंगी डॉ. मिलिंद बागुल, पी. जी. कोल्हे, संतोष कचरे, संजय ठाकूर, सचिन जंगले, दीपक वाणी व मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *