भाजपकडून स्मिताताईंना खासदारकीच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
![]()

भाजपकडून स्मिताताईंना खासदारकीच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
स्मिता वाघ यांचे सासरे २५ वर्ष सरपंच राहिलेले आहेत तर वडीलही पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. त्यामुळे बालपणापासून घरात राजकीय वातावरणाचे संस्कार त्यांच्यावर रुजले व वडील आणि सासरे यांच्या प्रेरणेतूनच त्यांच्यात एक कार्यकर्तीचा जन्म झाला असे त्या अभिमानाने सांगतात.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी गाजलेल्या तत्कालीन आंदोलनात स्मिता वाघ यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. [- ९०]च्या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्यांनी धडाडीने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यात ‘राष्ट्रवाद’ व ‘राष्ट्र प्रथम’ या विचारांची मुळे रुजली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची वैचारिक बांधिलकी असून संघ परिवाराच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.
स्मिता वाघ यांचा भाजपशी सर्वात पहिला संबंध १९९२मध्ये आला. तेव्हापासून भाजपच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. २००३मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली, तेव्हा सकुशल काम हाताळले व पक्ष बांधणीचे काम करत अनेक महिलांना पक्षाशी जोडले. २००२ ते २०१५ पर्यंत जळगाव जिल्हा परिषदेच्या सलग तीनवेळा सदस्य म्हणून निवडून आल्यामुळे जिल्ह्यातील राजकारण त्यांनी चांगलेच जवळून पाहिले आहे.
स्मिताताई वाघ यांचे पती उदय वाघ भाजपचे जिल्हाध्यक्ष होते व उदय वाघ यांचे ताईंना राजकीय क्षेत्रामध्ये चांगले पाठबळ दिले होते व त्यांच्या राजकारणाचा अनुभव ताईंसाठी खूप महत्त्वाचा होता पण त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे वाघ परिवारावर मोठे दुःखद संकट कोसळले होते …ताईने आपल्या मुलींना धिर दिला…
२००५ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सिनेट सदस्या म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवासाने जो वेग धरला, तो पुढे वाढतच राहिला. त्याचा प्रत्यय म्हणून २००९ला त्या जळगांव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या व त्या बरोबरच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याही झाल्या.. याचा परिपाक म्हणजे २०१५मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली, ती त्यांनी लीलया पार पाडली.
त्यांच्याकडे २०१७पासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी आली आहे. २०१७मध्ये त्या विधानपरिषदेच्या आमदार म्हणून निवडून आल्या, तेव्हापासूनच त्यांची पुढची वाटचाल लोकसभेकडे होणार अश्या चर्चा रंगू लागल्या होत्या. १७ व्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपतर्फे त्यांना जळगांव मतदार संघातून खासदारकीची उमेदवारी घोषित झाली होती पण पक्षाने शेवटी उन्मेश पाटील यांना उमेदवारी घोषित केली होती..
स्मिताताई वाघ अत्यंत मितभाषी व साध्या आहेत . कार्यकर्त्यांच्या परिवारात सुख असो दुःख असो त्यांच्या पाठीशी उभ्या राहणा-या नेत्या आहेत.. त्यांना कोणी फोन केला असेल त्या जर कामात बिझी असतील त्या जेव्हा त्यांचे काम संपले कि नंतर स्वतःहून ते फोन करतात ही त्यांची काम करण्याची पद्धत अनेक कार्यकर्त्यांना आवडते….
पण म्हणतात ना भगवान के घर देर है, मगर अंधेर नही!! या उक्तीप्रमाणे आमदार स्मिताताई वाघ यांना अखेर भाजप पक्षाने खासदारकीची उमेदवारी दिल्यामुळे अमळनेर तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.।
विशेष म्हणजे भाजप पक्षाने जळगाव जिल्ह्यातून दोघं महिलांना खासदारकी उमेदवारी घोषित केलेली आहे हे विशेष आहे…
अमळनेरला भाजप पक्षाकडून जल्लोष-
साजरा- अमळनेरला भाजप, राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गटाकडून स्मिताताई वाघ यांना खासदारकीचे तिकीट भाजप पक्षाने दिल्यामुळे जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजप पक्षाचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..
स्मिताताई वाघ यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर



