1 min read

कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित

Loading

कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात असून लोकांच्या व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाते.. याची पावती म्हणून जळगांव जिल्हा परिषद च्या माध्यमातून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..
सविस्तर माहिती अशी आहे की कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा क्षयरोग (टीबी) मुक्त गाव म्हणून पुरस्कार जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिकेत पाटील, तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते सरपंच श्री जगदीश निकम, उपसरपंच श्री जितेंद्रसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील यांना सदर पुरस्कार जिल्हा परिषद जळगाव येथे प्रदान करण्यात आला. इतिहासात प्रथमच आपल्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाल्याने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभिनंदन केलेले आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर कळमसरे येथील सर्व ग्रामस्थ मंडळ यांनीही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *