1 min read

संत नामदेव महाराज फाउंडेशन जळगाव तर्फे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

Loading

संत नामदेव महाराज फाउंडेशन जळगाव तर्फे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप तर्फे, टेलर बंधू भगिनींना कैची,धागे, व मेझर टेप,साड्या वाटप,

माझा ४५ वर्षाचा समाजसेवेचा कारकीर्दीत डॉ.मनिलाल शिंपी यांच्यासारखा निस्वार्थी मानवसेवा करणारा समाजसेवक पाहिला नाही.:शिवाजीराव शिंपी.

जळगाव( मनिलाल शिंपी ):संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन जळगाव संचलित संस्कार फाउंडेशन महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिवस दिनांक ९ मार्च २०२४ शनिवार रोजी मातोश्री बँक्वेट हॉल येथे साजरा करण्यात आल यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ‘मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर डॉ. श्री मणिलाल रतिलाल शिंपी, रंजनाताई विजय वानखेडे (माजी नगरसेविका)अर्चनाताई आशुतोष पाटील (सामाजिक कार्यकर्त्या) शिवाजीराव शिंपी (अखिल भारतीय राष्ट्रीय उपाध्यक्ष) संजयजी जगताप (अखिल भारतीय सहसचिव) तथा संस्कार फाउंडेशनचे मार्गदर्शक निलेशजी कापुरे (माजी अध्यक्ष तथा म.का.सदस्य) तसेच संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन पवार महिला अध्यक्ष रूपाली निकुंभ एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप सौ सारिका शिंपी, महिला अध्यक्ष नामविश्व शिंपी समाज फाउंडेशन च्या महिला अध्यक्ष सौ सारिका जगताप, दीपक निकुंभ, उपप्रमुख जिल्हा उद्योग आघाडी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व गणेश वंदना सादर करण्यात आली आणि कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रूपालीताई निकुंभ यांनी केले त्यानंतर शिंपी समाजातील टेलर बांधवांचे कौतुक आणि स्वागत म्हनून शहादा तालुक्यातील परिवर्धे येथील ज्येष्ठ टेलर श्री. रतिलाल रामदास शिंपी यांचा वयाचे (७५ वर्ष)अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,उद्योजक समाजसेवक डॉ रामचंद्र देसले, यांचा सहकार्याने कैची टेप व दोऱ्याचे बंडल वाटप करण्यात आले. तसेच कै. सरलाबाई भांडारकर व कै. मनिष भांडारकर यांचा स्मरणार्थ,कल्याण शिंपी समाजाचे खजिनदार श्री.प्रविण भांडारकर यांचा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त गरीब व गरजू महिलांना साडया वाटप करण्यात आल्या.
त्यानंतर चेतन पवार,रंजना विजय वानखेडे, अर्चना पाटील, सारिका शिंपी, सौ सारिका जगताप, डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी, चंद्रकांत जगताप, संजय जगताप, शिवाजीराव शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमांमध्ये मेहंदी काढणे व पाककला या दोन स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना पहिले दुसरे तिसरे अशाप्रकारे बक्षीस वितरण करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमात ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले
या कार्यक्रमास सुमारे २०० ते ३०० महिला, पुरुष मंडळी व बालगोपाल यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन संस्कार फाउंडेशनच्या सल्लागार सौ. सविताताई जगताप तसेच उपाध्यक्ष वैशाली बाविस्कर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. रुपाली निकुंभ, सौ, वैशाली बाविस्कर, ज्योती बागुल, सुषमा पवार, पुनम कापुरे, जगताप, सौ. माधुरी कापुरे, सौ. मीनाक्षी कापुरे, सौ. सारिका शिंपी, सोमनिषा सोनवणे, सौ. ज्योती जगदाळे, सौ. छाया शिंपी, सौ. साधना शिंपी, सौ. रवीना सोनवणे, सौ. ज्योती सोनवणे, सौ. रुपाली बागुल, सौ.कीर्ती शिंपी सौ. रेणुका खैरनार, सौ. राखी जाधव तसेच चेतन पवार, संजय जगताप, निलेश कापुरे, कुणाल बागुल, प्रमोद कापुरे, संजय निकम, प्रशांत सोनवणे, सुरेश बागुल, प्रवीण जगदाळे, आनंद शिंपी श्री नितीन कापरे, राज निकुंभ, मोहनिष जगताप, सुरज कापुरे,अथर्व कापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *