खान्देश माळी महासंघाचे अध्यक्ष मुरलीधर महाजन यांची अशीही सामाजिक बांधीलकी…
![]()

कळमसरे येथील मुरलीधर महाजन यांची अशीही सामाजिक बांधीलकी…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जन्मताच सामाजिक कार्याची आवड असल्यास माणूूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी त्याचे मन इतरांना मदत करण्यासाठी कदापीही शांत बसत नाही. सामान्य कुुटुंबातून जन्माला येवून मोठ्या पदावर कार्यरत राहून फक्त स्वत:च्या कुटुंबातच रममाण होणारे इतरांना मदत करण्यासाठी सहसा पुढे येत नाही. कळमसरे येथील माजी सरपंच व युवा उद्योजक मुरलीधर राजाराम महाजन याला अपवाद आहेत
सविस्तर माहिती अशी कि मा.सरपंच व खानदेश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर राजाराम महाजन एरंडोल हुन येतांना वाटेत कृष्णा हाॅटेलला जेवायला थांबले होते. जेवण करून बाहेर पडल्यावर समोरच एक माता व तिचा गोंडस मुलगा आमच्या कडून खायाला काहीतरी द्या म्हणून याचना करू लागला. त्यांनी परत हाॅटेलला जाऊन एक व्हेज पुलाव त्यांना आणून दिला. तो त्या दोघं मायलेकांनी आनंदाने स्विकारला. मी त्यांना परत शंभर रुपये दिलेत. परंतु येथेच त्या मातेने शंभर रुपये घेण्यास नकार दिला व ती भिकारीण माता (स्वाभिमानी) आम्हाला म्हणाली, भाऊ माझ्या लेकराला भुक लागली होती ती पुर्ण झाली, मला पैसे नकोत…मी त्या मातेला सांगितलं उद्यासाठी राहु देत..मला हया माऊली कडे बघून स्वाभिमान काय आहे हे समजलं……एक भिकारीण असुन देखील फक्त ती माऊली आजचा विचार करत होती……आणि आपण, विसपंचवीस लाखांच्या गाडीत फिरुन देखील दोन पैशांसाठी बरेच लोक स्वाभिमान गहाण ठेवत असतात….मिञांनो पैसाच सर्वकाही नाही, पण समाज पैसेवाल्यालाच ओळखतो, हेही तेवढेच सत्य आहे..आम्ही दोघं मिञ म्हणजेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे मा.जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब डाॅ. प्रतापराव महाजन , खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर आर महाजन…….आयुष्यातील गोड आठवण …….एकमेकांचं दुखः समजून घेतलं पाहीजेसमाजाला मदत करणे नैतिक कर्तव्य आहे, या सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून ते नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तप्तर असतात.. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे…

