1 min read

सुषमाताई देसलेपॉवरफुल वुमन” या पुरस्काराने सन्मानित

Loading

सुषमाताई देसले
पॉवरफुल वुमन” या पुरस्काराने सन्मानित

उत्कृष्ट कामाची दखल…
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्या हस्ते सन्मानित.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांनी प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच दहीवद, विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुबई , संचालक कृषी उत्पन्न बाजारसमिती अमळनेर ह्या पदावर कामअतिशय धैर्याणे तसेच प्रभावाने कार्य करुन सामान्य जनतेचे तसेच महिला हिताचे कामे केलित, तसेच इतरांनी गावविकासात केलेलाअडथळा , न जुमानता त्यांचे विरोधातही गावविकासाची कामे तसेच महिला साबलीकरण , मेगा वृक्षारोपण , जिप प्राथमिक शाळा सुधारणा व विकास कार्य , पाणी समस्या आरोग्य व शेतकरी हिताचे यावर प्रामाणिक पारदर्शक प्रभावी कार्य केले म्हणून त्यांचा लोकमत वृतपत्र समूहाचे वतीने “पॉवरफुल वुमन” हा पुरस्कार नाशिक विभागातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांचे उपस्थितीत , सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी ,सौ जयंती कठाले व श्री संदीप कर्णिक साहेब मा पोलिस आयुक्त नाशिक, यांचे शुभ हस्ते होटल ताज गेटवे नाशिक येथे अतिशय दिमाखात प्रदान करण्यात आला . सौ सुषमाताई याना यापूर्वी असंख्य संस्था .संघटना, मंच यांचेकडून त्यांचे कार्याची दखल पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत , सौ सुषमाताई याना प्राप्त “पॉवरफुल वुमनपुरस्कार “बद्दल त्यांचे मा ना श्री अनिल दादा पाटील, सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष श्री दत्ताभाउ काकडे ,श्री अशोक पाटील सभापती बाजार समिती अमळनेर यांचेसह असंख्य मान्यवर व त्यांचे चाहते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *