महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान संपन्न
![]()
महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान संपन्न
अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम


अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत व्याख्यानमाला व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते
दिनांक 12 मार्च 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत कार्यशाळा अंतिम सत्र संपन्न झाले, व अभियान समारोप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती प्रा. डॉ. भरत खंडागळे समाजकार्य महाविद्यालय अमळनेर व मा. अश्वमेध पाटील ग्रामीण रुग्णालय अमळनेर हे उपस्थित होते. तसेच सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. जगदीश सोनवणे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर यांनी अभियान अंतर्गत झालेले विविध कार्यक्रम याबाबत संक्षिप्त माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वागत समारंभ नंतर कार्यक्रमा च्या प्रमुख साधन व्यक्ती प्रा.डॉ. भरत खंडागळे यांनी युवक-युवतींसाठी सकस आहार, व निरोगी जीवनशैली यामध्ये दैनंदिन आहार,आरोग्य आराम जीवनसत्व युक्त पदार्थ व्यायाम व योगा स्वच्छता विद्यार्थ्यांचे गट तयार करून विषयाबाबत मार्गदर्शन केले. प्रथम सत्राच्या अध्यक्ष यांनी दैनंदिन जीवनात आनंदी जीवनासाठी निरोगी आरोग्य आवश्यक आहेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात साधन व्यक्ती अश्वमेध पाटील व विजेंद्र मोरे यांनी आरोग्य समुपदेशन या विषयासंबंधी सामाजिक जीवनात आरोग्याचे महत्त्व पोषक आहार व्यायाम करणे. विविध आजारांबाबत समाजकार्य प्रशिक्षणार्थीनी समाजात जागृती व समुपदेशन करावे. याबाबत मार्गदर्शन केले. द्वितीय सत्राचे सत्रसंचलन प्रा. धनराज ढगे यांनी केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्राचार्य पी. एस. पाटील यांनी विद्यापीठ अंतर्गत कार्यशाळेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले असे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पी. एस. पाटील व मा. अनुरूपाताई भांडारकर यांच्या मार्गदर्शना नुसार कार्यक्रम नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.अनिता खेडकर यांनी केले. तसेच प्रा.विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ.श्वेता वैद्य प्रा.डॉ.अस्मिता, प्रा. डॉ. भरत खंडागडे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे प्रा. धनराज ढगे, प्रा. डॉ. सागर चव्हाण कार्यालयीन अधीक्षक अनिल वाणी, ज्योती सोनार मॅडम, महेश शेलार , ठाकरे ईश्वर, कोमल सूर्यवंशी, प्रशांत भंडारी, पगारे भावेश,जयेश भोई, फकीर अन्वर, धनगर मनोज, भावेश मराठे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा पाडवी या विद्यार्थ्यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सायली पाटील या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाची एकूण 82 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

