अमळनेरला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत झाली चर्चा
![]()

अमळनेरला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत झाली चर्चा
अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची सभा संपन्न…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची सभा 10 मार्च 24 रोजी दुपारी 1.30 वाजता नवनिर्वाचित अध्यक्ष श्री बी.के. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यात सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष श्री मनोज पाटील यांनी केले. व त्यानंतरची बी.के सूर्यवंशी यांचा सामूहिक सत्कारचा कार्यक्रम झाला. तसेच साने गुरुजी पतपेढीचे पॅनल प्रमुख, श्री तुषार बोरसे सर व नवनिर्वाचित चेअरमन श्री रमेश चव्हाण, यांचा सत्कार, पतपेढीचे फाउंडर श्री शांताराम बापू पाटील यांच्या हस्ते झाला. तर अंमळनेर तालुका अल्पसंख्यांक नवीन अध्यक्ष श्री अजहर शेख यांचाही सत्काराच्या कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्यायात्रेत सहभागी होण्याबाबत चर्चा झाली. त्यात महिलांचा सहभाग जास्तीत जास्त असन्या संदर्भात श्री संदीप घोरपडींनी विषय मांडला. त्या संदर्भात श्री के.डी बापू पाटील, माजी जि. प. सदस्य यांनी, त्यांच्या विद्यालयाच्या दोन मोठ्या गाड्या व दोन लहान गाड्या डिझेल सह धुळे येथे भारत जोडो न्याय यात्रेसाठी देण्याची तयारी दर्शवली. व इतर कार्यकर्त्यांनी स्वतःच्या गाड्या, मोटरसायकलीवर जाण्याची ठरवले. त्यात साडेतीनशे ते चारशे कार्यकर्ते जातील असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे B.L.A. ब्लाक लेवल प्रमुखांच्या नोंदणीची चर्चा झाली. त्यात श्री मनोज पाटील व युवक तालुका अध्यक्ष श्री महेश पाटील यांनी, सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगताना त्यांच्याकडून नोंदणीचे प्रॅक्टिकल करून घेतले. त्यानंतर श्री. भागवत सूर्यवंशी यांनी सत्काराला उत्तर देताना, “माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही. मी पूर्ण तालुकाभर काँग्रेस पक्षाची ध्येय धोरनांचा प्रचार करेल,पक्षाची ताकद वाढवेल” असे सांगितले. तसेच श्री भागवत गुरुजी, सौ सुलोचना वाघ, एम.डी पाटील, अशी बऱ्याच पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली व कार्यकर्त्यांनी चर्चेत प्रचंड उत्साह दाखवून प्रत्येक विषयाच्या चर्चेत हिरीरीने सहभाग घेतला. त्यात सौ नयना पाटील,सौ. कल्पना वानखेडे, श्री संभाजी पाटील, प्रा. श्याम पवार, गजेंद्र साळुंखे, मगन भाऊसाहेब, तुकाराम चौधरी, अलीम मुजावर, भगवान संदांशिव, यांनी भाग घेतला. तर, कार्यक्रमास उत्तम पाटील, डॉक्टर रवींद्र पाटील, किशोर पाटील, पार्थराज पाटील, अशोक पाटील, प्रदीप शिरोळे, दिलीप पाटील, दिनकर अण्णा पाटील, चेतन पाटील, लोटन पाटील, राकेश पवार, डॉक्टर बीयू पाटील, शांताराम पाटील, पितांबर आप्पा पाटील, संजय सोनवणे, ज्ञानेश्वर सोमवंशी, रिजवान शेख, भगवान बाबा पाटील, नारायण पाटील, रामलाल पाटील, अरुण पाटील सर, अशोक पाटील, नर्सिंग पाटील, असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

