1 min read

प्रशांत बडगुजर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

Loading

प्रशांत बडगुजर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडगुजर यांची माननीय नामदार अनिल दादा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली.
प्रशांत बडगुजर यांची अमळनेर शहरात सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी आहे तसेच त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात युवकांची फळी उभी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून नामदार साहेबांनी युवा नेतृत्वास संधी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल नामदार अनिल पाटील ,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस भूषण भदाने ,तालुकाध्यक्ष भागवत पाटील ,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक जळगाव जिल्हा प्राध्यापक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटील, गौरव पाटील ,पंकज साली, इमरान खाटीक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *