1 min read

धर्म कधीच धोक्यात येत नाही, सत्ता धोक्यात येते- प्रा.अशोक पवार

Loading

धर्म कधीच धोक्यात येत नाही, सत्ता धोक्यात येते– प्रा.अशोक पवार

अमळनेर प्रतिनिधी
निर्भय बनो अभिमान संविधान आणि लोकशाहिच्या जनजागरण मोहिमेअंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन राम मंदिर चौक,शेवगे बु|| ता.पारोळा येथे करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.गौतम मोरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी भारत जोडो अभियान या विषयी माहिती दिली. आपण सर्वांनी विचार करावा कि लोकशाही कशी टिकेल.आपल्या समोर महत्त्वाचे प्रश्न न मांडता दिशाभूल केली जाते.देशातील नागरिक म्हणून आपण विचार केला पाहिजे. आपण ग्रामीण भागातील असुन शेती विषयावर चर्चा करायला केंद्रात असलेले सरकार तयार नाही.हि मोहीम निरंतर सुरू राहील. पुढील वक्ते रियाज भाई यांनी सांगितले की !!खाके वतन तुझ से वो रिस्ता है हमारा मरकरभी जुदा होना नहीं ये गवारां !!जातीजाती मध्ये तेड निर्माण करण्यात येत आहे.सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज फातिमा शेख आणि उस्मान शेख यांचा इतिहास माहिती असने गरजेचे आहे.आज आपण संविधान विसरतो कि काय याची शंका वाटते.तरुण बेरोजगार आहे, आजचा समाज मंदिर, मज्जीद मध्ये गुरफटून टाकला आहे.पुढील वक्तव्यात मा.प्रा.अशोक पवार सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिवनपट उलगडला.निर्भय बनो अभियान अंतर्गत आपण देशातील नागरिक आहोत ,आपले हित आपण शोधले पाहिजे. परिवर्तन घडत ते मध्यमवर्गीय असणाऱ्या कडून घडले पाहिजे. तरुणांनी आजच्या घडणाऱ्या घटनांचा विचार करावा. केंद्र सरकारने धोरणांचे सोशल आँडिट झाले पाहिजे. पुढील तीन महिने निर्भय बनो आंदोलन सुरू राहील. स्वामी नारायण आयोगाच्या शिफारशी लागु झाल्या पाहिजेत हा लढा आपल्याला द्यावा लागेल.तेव्हा च देशातील शेतकरी बांधवांना शेतमालाला हमीभाव, न्याय मिळेल.केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करत आहे.खतांच्या किंमती वाढल्या. पडी महगांई कि मार ,मोदी सरकार तडीपार.घरगुती गँस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, खते यांच्या किंमतीत भाववाढ प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.म्हणजे महागाई ची मार सर्वसामान्य माणसाला बसते आहे. उद्योगपतीनां करमाफी केली.निर्भयबनो कार्यकर्ते यांच्या वर हल्ला करताय. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.हरिश्चंद्र भानुदास पाटील, मा.डिगंबर पाटील,मा.हरिश्चंद्र वना पाटील, मा.राकेश पाटील, आर.एन.पाटीलमा.फत्ते शिंग पाटील, रोहीदास पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *