अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला अमळनेर मेडिकोस बॉक्स क्रिकेट लीग – 3 चा थरार
![]()

अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला अमळनेर मेडिकोस बॉक्स क्रिकेट लीग – 3 चा थरार
अमळनेर प्रतिनिधी
8 ,9 आणि 10 मार्चपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग नोंदविला. यावर्षी डेंटल असोसिएशन,अमळनेर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी ही स्पर्धा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अयान मल्टीस्पोर्ट्स च्या ग्राउंडवर भरविण्यात येते. मेडिकल क्षेत्राशी निगडित असणारे सर्व घटक म्हणजे डॉक्टर्स, केमिस्ट, पॅथॉलॉजी, पीएचसी सेंटर या स्पर्धेत सहभाग नोंदवितात. या स्पर्धेचा अंतिम सामना अँक्लॅप वॉरियर 1 आणि पीएससी जानवे यांच्यात झाला. अतिशय चुरशीच्या सामन्यात अॅक्लॅप वॉरियर 1 संघ विजयी ठरला. सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार अनन्या जोशी हिने पटकावला. उत्कृष्ट गोलंदाज सीएम पाटील आणि जयप्रभा ओसवाल ठरले. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार अनन्या जोशी आणि शुभम सोनवणे यांना देण्यात आला. तर निलेश पाटील हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला.


