1 min read

मुख्यमंत्री माझी शाळा…सुंदर शाळा अभियानांतर्गतजळोद जि प शाळा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक…….

Loading

मुख्यमंत्री माझी शाळा…सुंदर शाळा अभियानांतर्गत
जळोद जि प शाळा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक…….

अमळनेर प्रतिनिधी -दिनांक 10 मार्च 2024 रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह महाबळ जळगाव येथे नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातून जळोद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने दुसरा क्रमांक पटकावत पाच लाख रुपयाचे बक्षीस मिळवले.
सदर बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी ग्राम विकास मंत्री मा. ना.श्री गिरीश भाऊ महाजन, माननीय आमदार सुरेश भोळे, माननीय श्री आयुष प्रसाद साहेब जिल्हाधिकारी जळगाव, माननीय श्री अंकित साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव, माननीय श्री विकास पाटील साहेब शिक्षण अधिकारी जि प जळगाव, अर्पित चव्हाण साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते जळोद शाळेला बक्षीस प्रदान करण्यात आले.
बक्षीस स्वीकारण्यासाठी सौ. कल्पना चौधरी सरपंच , श्री ज्ञानेश्वर चौधरी, सौ भारती साळुंखे (मा. सरपंच, )श्री शशिकांत साळुंखे, श्री. अनिल पाटील, श्री. विलास देशमुख,श्री सुरेश भोई,श्री. देवराम चौधरी,व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *