1 min read

बडगुजर समाज पंच मंडळ कडून जेष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार उत्साहात झाला संपन्न

Loading

बडगुजर समाज पंच मंडळ कडून जेष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार उत्साहात झाला संपन्न

अमळनेर प्रतिनिधी:दिनांक १०/०३/२०२४ रविवारी दुपारी पाच वाजता बडगुजर समाज मंगल कार्यालयात मान्यवरांचे शुभहस्ते बडगुजर समाजातील वयाची ७५ वर्षे पार केलेल्या भाग्यवान मातृ पितृ तुल्य ज्येष्ठांचा अमृत महोत्सव आणि पदोन्नती धारक व सेवानिवृत्त समाज बंधू भगिनींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ आण्णासाहेब श्री माधवराव बाबुराव शेठ बडगुजर होते तसेच व्यासपीठावर सन्माननीय अतिथी ताईसाहेब सौ.जयश्री अनिल पाटील ( जि.प.सदस्या, अध्यक्ष सं.गा.नि.यो.अमळनेर), मा.श्री.सुनिल नंदवाळकर साहेब डी.वाय.एस.पी अमळनेर,ताईसाहेब सौ स्वप्ना विक्रांत पाटील, सरिता नारायणशेठ जाधव (ग्रेडेड मुख्याध्यापिका).,मा.श्री.शरद पाटील( सिनियरइंजिनिअर) मा.श्री.भाऊसो.महेंद्र सुधाम महाजन ( उद्योजक व सामाजिककार्यकर्ते),मा.श्री.संजय सुदाम चौधरी ( मा . प्रशासन अधिकारी नप अमळनेर). मा.श्री प्रकाश लांडगे ( सेवानिवृत्त पर्यवेक्षकखा.शि.मंडळ) मा.श्री.डाॅ.विशाल आर बडगुजर ( बालरोग तज्ज्ञ) ,ताईसाहेब सौ.मनिषा विशाल बडगुजर ( उत्कर्ष मेडिकल्स),मा.श्री आबासाहेब प्रवीण पुंडलिक शेठ बडगुजर उपस्थित होते . ताईसाहेब सौ जयश्री पाटील यांनी आपले बडगुजर समाजशी निगडित नाते असून मंडळाने आयोजित केलेल्या आजच्या सन्मान सत्कार सोहळ्याचे कौतुक करून आभार मानले तसेच मा.श्री.डि वाय एस पी . सुनील नंदवाळकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की.कुटुंबातील जेष्ठ वयोवृद्ध व्यक्तींच्या अनुभव महत्त्वाचे असतात तेच आपले परिवाराचे वैभव व मार्गदर्शनआहेत.त्यांचेशी
सुसंवाद साधला पाहिजे.त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.आजच्या तरुण पिढी व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षा कडे लक्ष ठेऊन प्रगती साधली पाहिजे समाजाने देखील अशाभावी उज्वल पिढी घडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.आणि घरातील आईवडीलांनी आपल्या मुला, मुलींच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.अन्यथा वाईट गोष्टींना चालना मिळते.असे समाज प्रबोधन, प्रगती,व उत्कर्ष बाबतीत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले व आजच्या आयोजित कार्यक्रम गौरवास्पद आहे म्हणून बडगुजर समाज पंच मंडळाचे आभार मानले.आलेल्या मान्यवरांचे शुभहस्ते पदोन्नती धारक व सेवानिवृत्त आणि जेष्ठांचे शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलेत .सदर प्रसंगी पदोन्नती धारक श्री विजय संतोष शेठ बडगुजर (वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी) यांनी अमळनेर येथे सुरू असलेल्या कुलस्वामिनी श्री चामुंडा मातेच्या मंदिर बांधकामासाठी ५०००/- पांच हजार रुपयाचा चेक देत कार्यकारिणी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.आजच्या अशा हर्षित सोहळ्यात सुमारे ४० जेष्ठ मातृ पितृ तुल्य आणि आलेले पदोन्नती धारक व सेवानिवृत्त सर्व समाज बंधू भगिनींचा सन्मान सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून अती उत्साहात करण्यात आला . कार्यक्रमाचे धडाकेबाज सूत्रसंचालन मा श्री किरण शांताराम शेठ बडगुजर सर यांनी केले.आणि सन्मान सत्कार सोहळा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *