1 min read

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य.– डॉ.संजय शिंदे.

Loading

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य.– डॉ.संजय शिंदे.

जळगांव: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने गेल्या ५ वर्षात शासन दरबारी प्रयत्न करून असंख्य प्रश्नांची उकल करण्यात यशस्वी पाठपुरावा करण्यात आलेला असून भविष्यात देखील प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदैव प्रयत्नशील राहून त्या समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील असे प्रतिपादन राज्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी आज केले.
येथील अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना जिल्हा पदाधिकारी व तालुका अध्यक्ष/सचिव यांच्या संयुक्त सहविचार सभेत आज ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात महासंघाच्या वतीने वाढीव पदांवर कार्यरत शिक्षकांना मंजुरी मिळवून त्यांचे समायोजन करणे, आय.टी. विषय शिक्षकांचे समायोजन, सरसकट निवड श्रेणी लागू करणे, जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होण्यासंदर्भात यशस्वी प्रयत्न हा राज्य महासंघाच्या एकत्रित प्रयत्नांचा परिपाक असून भविष्यात इतर प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी जोरदार पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष जळगाव जुक्टो संघटना) हे होते. याप्रसंगी डॉ.संजय शिंदे यांचा जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होण्यासंदर्भात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रा.नंदन वळींकार व प्रा.सुनील सोनार (जिल्हा सचिव) यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करून त्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. या सभेचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे संचालक ऍड. संदीपजी गोपाळराव गुळवे यांनी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री.विजय नाना पगार (संचालक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक) श्री.जी.टी.पगार उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.श्री.सुनील गरुड, प्रा.डी. डी.पाटील (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा.शैलेश राणे (कार्याध्यक्ष), प्रा.राजेंद्र तायडे, डॉ.अतुल इंगळे, प्रा. गजानन वंजारी, प्रा.पी.पी.पाटील, प्रा.राजेश भटनागर प्रा.संजय पाटील (उपाध्यक्ष), प्रा. राजेंद्र चव्हाण (सहसचिव) प्रा.राहुल वराडे (महानगराध्यक्ष), प्रा.सुधाकर ठाकूर (अध्यक्ष जळगाव ग्रामीण), प्रा.स्वप्नील पवार (तालुकाध्यक्ष अमळनेर), प्रा.रमाकांत धनगर (तालुकाध्यक्ष चोपडा), प्रा. शशिकांत पाटील (तालुकाध्यक्ष पारोळा), प्रा.हितेंद्र पाटील (तालुकाध्यक्ष यावल), प्रा.शरद पाटील (तालुकाध्यक्ष भुसावळ) प्रा.अनिल सोनवणे, प्रा.राजेश कोष्टी, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.नितीन बावस्कर, प्रा. छाया चौधरी, प्रा.गीता महाजन, प्रा.अनिता ओव्हाळ, प्रा. प्रमिला सोनवणे, प्रा. एकता कवटे, प्रा.माधुरी पाटील यांचेसह असंख्य शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप पाटील (चोपडा), प्रास्ताविक प्रा.नंदन वळींकार तर आभार प्रदर्शन डॉ.अतुल इंगळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *