जागतिक महिला दिन भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा
![]()

जागतिक महिला दिन भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी
“जागतिक महिला दिन’ भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा साजरा करण्यात आला. दोन्ही सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगल सोनवणे यांनी स्वीकारले. कार्यक्रमास सौ विजया गायकवाड व श्रीमती ज्योतिर्मयी बाविस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.कर्तुत्वान महिलांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मंगला सोनवणे व सौ विजया गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या सकाळ व दुपार विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे, अप्रतिम नृत्य सादरीकरण, नाटिका,गाणे, सादर करून महिलांविषयी आदरभाव व्यक्त केला. या कार्यक्रमात सौ विजया गायकवाड, व श्रीमती ज्योतिर्मयी बाविस्कर यांनी महिलांचे सबलीकरण व महिलांनी एकजुटीने कसे राहावे याबद्दल मार्गदर्शन केले. सौ तृप्ती खैरनार यांनी लेक वाचवा लेक शिकवा यावर आधारित एकपात्री नाटक सादर केले. प्रियंका बाविस्कर यांनी आई विषयी कविता सादर केली श्रीमती विद्या पाटील यांनी सत्य घटनेतून महिला काय करू शकते हे सांगितले. श्रीमती दिपाली देसले व सौ वासंती काटे यांनी महिलांदिना विषयी कविता सादर केली. श्रीमती नीता पाटील यांनी गोष्टीतून महिलांना अप्रतिम संदेश दिला. दुपार सत्रामध्ये सौ शुभांगी कुलकर्णी यांनी महिला दिन कधी व कसा साजरा करण्यात आला हे सांगितले. सौ सविता देशमुख यांनी सावित्रीच्या ओवी हे अप्रतिम सादर केले व महिला दिनाविषयी कविता सादर केली. श्रीमती मनीषा गवते यांनी जन्म बाईचा हे सुंदर असे गीत सादर केले. श्रीमती रूपाली पवार यांनी एकमेकांचा आदर कसा करावा ही सद्भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. सौ कविता पाटील यांनी कर्तुत्वान महिलांविषयी महत्व सांगून. गीत सादर केले. सौ वैशाली पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून कविता सादर केली. शिपाई बाई श्रीमती रेखा यांनी आई विषयी गीत सादर केले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन तृप्ती खैरनार व दुपार सत्राचे सूत्रसंचालन सौ शुभांगी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मंगला सोनवणे यांनी मुलांना मार्गदर्शन व बोधपर गोष्ट सांगून उपकृत केले. श्रीमती राजश्री पाटील मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास श्रीमती ललिता गवळी, सौ रश्मी संवत्सरे, श्रीमती प्राची ब्रह्मे . व इतर कर्मचारी उपस्थित होते

