1 min read

माता सावित्री तुझी स्मृती न विसरण्यासारखी!!

Loading

माता सावित्री तुझी स्मृती न विसरण्यासारखी!!

बहुजनाच्या शिरावर लादलेल्या काळात अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी एक तेजस्वी जोडपे पुढे आले आणि ज्ञानाची कवाडे खुली झाली. ते जोडपे होते तात्यासाहेब जोतिराव व सावित्रीमाई...अस्तित्व नसलेल्या गोषटीचा बाजार मांडून बहुजनांना पुरोहितांनी बेजार केले होते. इंग्रजी सत्ता असतांना हा अन्याय होत होता. यापूर्वीची परिस्थिती भयानक होती. मानव इथून तेथून सारखा मग त्याला श्रेष्ठ व कनिष्ठतेची लेबल कशाला?तरी ही तो कुणाच्या घरात जन्माला आला त्यावरून तो श्रेष्ठ ठरत असे. विज्ञानाला कायमचे दूर सारण्याच्या काळात जोतिराव व सावित्रीमाई विवेकाची ज्योत घेऊन निघाले. ह्या ज्ञानयज्ञाला पुढे नेणाऱ्या सावित्रीमाई यांचा आज स्मृतीदिन आहे. अज्ञानाच्या खोल गर्तेत जगण्याच्या काळात अक्षराची ओळख घराघरातून करून देणारी मशालेचा जन्म नायगाव हया सुंदर गावी 3 जानेवारी 1831 ला झाला. नायगाव हे साताऱ्या जिल्ह्यातील खंडाळा तालुका असलेले गाव होते. एका माळी कुटूंबातील झाला. अक्षराला सामान्य लोकांपर्यंत जाऊ न देणाऱ्या पुरोहित, सनातनी, कर्मकांड करणाऱ्या लोकांचा काळ..आम्ही सांगू तिच पुजा करायची, कुणी करायची पूजा ते पुरोहित ठविणार..पेशवेशाहीच्या अंतानंतरचा काळ मात्र अन्यायाची धग अजूनही मिटलेली नव्हती. अशा काळात स्वत:शिकून समाजाला शिक्षणाची वहिवाट करून देणाऱ्या सावित्रीमाई ह्या अक्षररागिणीने सारा भारत साक्षर करण्यासाठी ज्ञानाचा पाया रचला. एका झपाटलेल्या कुटंबाने ज्ञानाचा हा वृक्ष सनातन्यांनी अज्ञान पेरलेल्या भूमीत सर्वप्रथम लावला. सनातन्यांनी चालविलेल्या मुजोरपणाला मोठी चपराक होती. सालस, निर्भीड, धाडसी, परोपकारी सावित्रीमाई तात्यासाहेब यांच्या सोबत उभी राहिली. एका बाजूने अनिष्ट रुढीचे खंडण करित ही समाजसुधारक जोडी कुणाला न भीता काम करित राहिली. कित्येक कर्मठ पुरोहितांनी त्रास दिला परंतू ज्ञानाचा वस्ताद असलेल्या जोती साहूने कर्मकांडयांचे पुणे हि पुण्याची ओळख पुसुन काढली. जमीनीची आईप्रमाणे सेवा करणारा हा कृषीपुत्र जमीनीत प्रयोग करित सेंद्रीय पध्दतीची जमीन कसून समाजात समतेचे पीक पेरत राहीला. साहू धन्याला साथ देत राहिली. साहूने स्वत: शिकून समज असलेला विवेकी समाज ऊभा केला. आज आम्ही सावित्रीमाई चा फोटो लाऊन तिच्या विचारांना पूजणे सोडून फोटो पूजन यात वेळ घालवितो. सावित्रीमाई चे विचार असतांना काल्पनिक गोष्टी चिटकवून ठेऊन सावित्रीमाई च्या विचारांना तिलांजली देतो. सावित्रीमाई च्या गुणांचा स्विकार व्हावा ही अपेक्षा आहे. आधुनिक युगात कर्मठ विचाराकडे झुकत असू तर सावित्रीमाई चे विचार आम्ही लाथाडल्यासारखे होइल. आजही मुली,महिला हळदी कुंकुत रमल्या परंतु सावित्रीमाई चा विचार बाजूला ठेऊन जगत आहे. सत्यशोधक समाजाने दिलेला विचार कृतीत आला नाही. साऱ्या गोष्टी आमच्या मुहूर्ताशिवाय होत नाही. आमच्या प्रत्येक घरात सत्य नारायणाची पुजा होते. आमच्या मुलांची नावे जन्म आपण देतो व नाव दुसराच व्यक्ती ठेवतो. वारकरी परंपरा जी पुर्वी संत तुकारामांना अपेक्षित हीच उत्तम परंपरा असतांना आम्ही कर्मठ विचारांकडे झुकतो आहे. पुरोहितांनी ग्रंथ लिहतांना वारकरी परंपरेतील संताना काल्पनिक पध्दतीने मांडून परंपरा दुषीत केली. क्रांतीची परंपरा भक्तीची दाखवली. तात्यासाहेब यांनी लिहलेले साहित्य व्याकरण नसलेले असे सुतोवाच केले. खऱ्या विचाराला झाकण्याचा सदैव विचार केला. विद्रोह मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सावित्रीमाई ने रचलेला पाया आज उभा आहे तो भक्कम करण्यासाठी सत्यशोधक विचाराने जगण्याची गरज आहे. कुणीही भोंदू येवो आम्ही विचलित होता कामा नये. बरेच लोग सावित्रीमाई ला मानतात परंतु त्यांचा सत्यशोधक विचार स्विकारत नाही. मुली, महिला वडाला प्रदक्षिणा मारणे बंद करित नाही. हरितालीका किती केल्या तरी तोच नवरा मिळत नाही हे सत्य असतांना हे व्रत करतात मग विचार कसे रुजणार..सावित्रीमाई ला आम्ही मानतो परंतु त्यांचे विचार स्विकारत नाही.

पत्रकार
एस.एच. भवरे
9284695140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *