अमळनेरला ११ मार्चला शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
![]()

अमळनेरला ११ मार्चला शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
देता की जाता मोर्चा साद शेतकऱ्यांची. !
महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष तसेच सर्व शेतकरी संघटनाचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
सध्या अमळनेर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतमालाचे पडलेले भाव दिवसेंदिवस महाग होत चाललेली खते व बी बियाणे त्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे विदारक चित्र तालुकाभरात आहे तरी देखील सरकारला जाग येत नसल्यामुळे सरकारला भानावर आणण्यासाठी अंमळनेर तालुका महाविकास आघाडी तर्फे भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात येत असून मोर्च्यात खालील मागण्या करण्यात येत आहेत
मोर्चातील प्रमुख मागण्या –
सतत ४२ दिवस पाऊसाचा खंड पडूनही अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नसून अमळनेर तालुक्यास दुष्काळी जाहीर करून २०२३ च्या खरीप हंगामासाठी दुष्काळी अनुदान मिळावे
« फेब्रुवारी २०२४ मध्ये गारपीट, अवकाळी पाऊस व वादळ यामुळे झालेल्या नुकसानीचे हेक्टरी ५० हजार अनुदान तात्काळ देण्यात यावे
«२०२९१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गुलाबी वादळाचे अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे « सर्व प्रकारच्या शेतमालास एम.एस.पी. जाहीर करण्यात यावा
महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेचे ५० हजार प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावे
पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची निवड लवकरात लवकर करण्यात यावी
२०१९ च्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करून विलंब करणाऱ्या अधिकार्यांवर कार्यवाही करण्यात यावी
खत बियाणे व शेतीचे अवजारे यांच्या किमती ५०% ने कमी करण्यात याव्यात « गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात यावा
सोमवार ११ मार्च २०२४
सकाळी १० ; ०० वाजता
ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह ते तहसील कार्यालय , अमळनेर
आयोजक – महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष तसेच सर्व शेतकरी संघटना , अमळनेर सदर मोर्चात तालुक्यातून हजारो शेतकरी बेलगाडी , ट्रॅक्टर , नांगर ब शिंगाडे इ. शेती अवजारांसह भाग घेणार आहेत. तरी सर्व शेतकरी , शेतमजूर व शेतकरी पुत्रांनी अवश्य उपस्थिती द्यावी असे आवाहन डॉ.अनिल शिंदे , सचिन बाळू पाटील , श्याम पाटील , सुभाष सुकलाल पाटील , धनगर दला पाटील , अनंत निकम , दिनेश पवार , सुरेश पिरण पाटील , डॉ.बी.एस.पाटील , तिलोत्तमा पाटील , चंद्रशेखर भावसार , राज् शेख , मुन्ना शर्मा , रियाज काझी , अशोक पवार , के.डी.पाटील , गिरीश पाटील , अशोकदादा पाटील , सचिन वाघ , उन्मेष पाटील , डॉ.किरण पाटील , अरुण शिंदे , कमल आक्का पाटील , शिवाजी गोसावी , राकेश सुंदडा , पन्नालाल मावळे , शांताराम बापू , प्रताप आबा , सुनील पवार , बाळू कदम , समाधान कंखरे, त्रंबक पाटील , भागवत गुरुजी , संभा बापू , नितीन निळे , श्रीकांत पाटील
यांनी केले आहे.

