1 min read

प्रताप महाविद्यालयात डॉ. मयुरी जोशी यांचे व्याख्यान संपन्न

Loading

प्रताप महाविद्यालयात डॉ. मयुरी जोशी यांचे व्याख्यान संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात शारीरिक शिक्षण, क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी (जागतिक महिला दिनानिमित्त) मार्गदर्शनपर व्याख्यान आणि BMI शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमसाठी सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मयुरी जोशी यांनी विद्यार्थिनींना सध्या-सोप्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
भूषण सानप (वेलनेस कोच, चोपडा) यांनी बी.एम.आय, विषयी, फिटनेस आणि आहार विहार या विषयावर महत्वाची माहिती सांगितली. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थिनींची बी.एम.आय तपासणी मोफत करून दिली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव डॉ. ए. बी. जैन, सहसचिव तथा सिनेट सदस्य डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ. नलिनी पाटील, सिनेट सदस्य आणि जिमखाना प्रमुख डॉ. संदीप नेरकर, डॉ. योगेश तोरवणे, डॉ. वृषाली वाकडे, डॉ. अमोल मानके, डॉ. सुनील राजपूत, प्रा. वैशाली राठोड, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा. वैशाली महाजन, डॉ. वंदना भामरे, आदि उपस्थित होते.
कार्यक्रम आयोजन डॉ. सचिन पाटील (क्रीडा संचालक), डॉ. हेमंत पवार रा.से.यो अधिकारी), प्रा. अर्चना सचिन पाटील (क्रीडा व योग शिक्षिका), क्रीडा व रा.से.यो. विभागातील विद्यार्थिनींनी केले.
डॉ. संदीप नेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. प्रियंका पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. हेमंत पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *