1 min read

फकिरा खोकरे यांना महाराष्ट्र शासनाचा समाज भुषण पुरस्कार जाहीर

Loading


श्री . कृष्णा अरुण महाजन (एरंडोल तालुका प्रतिनिधी) नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यात एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा समाज सरपंच श्री फकिराजी खोकरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाची निवड केलेली आहे.
त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार येत्या १२ मार्च रोजी मुंबई येथे देण्यात येणार आहे.श्री फकिरा भाऊ खोकरे यांना महाराष्ट्र शासनाचा समाज भुषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शासना कडुन जळगाव समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांनी आज एरंडोल येथे निवासस्थानी भेट दिली व फकिरा भाऊ खोकरे यांचे अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार केला व मुंबई येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण प्रसंगी आमंत्रण देत आयोजन माहिती दिली..🙏🙏💐💐श्री फकिरा भाऊ खोकरे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना प्रा आर एस पाटील सर व सुप्रसिद्ध कलावंत संजयकुमार पल्लीवाळ..!💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *