पालघर जिल्हा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, जिल्हा आधार सेवाभावी संस्था आणि जे पी विजया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न….!
![]()


पालघर जिल्हा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, जिल्हा आधार सेवाभावी संस्था आणि जे पी विजया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न….! —————————– पालघर..
८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ,आधार सेवाभावी संस्था आणि जे पी विजया चॅरिटेबल ट्रस्ट या तिन्ही संस्थेच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन या तिन्ही करण्यात आले होते. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अध्यक्ष व साप्ताहिक नवाहाल चे संपादक जे पी करोतिया आणि आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख तथा उपक्रम आयोजक देवेंद्र मेश्राम यांच्या वतीने धनानी नगर बोईसर येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी महिलांना संस्थेच्या वतीने भेट वस्तू देण्यात आल्यात.या हळदी कुंकू समारंभात वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निता राऊत,संगीता जयस्वाल,जयंती महतो उपस्थीत होत्या.त्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आणि त्यात प्रमुख भूमिका म्हणून आधार सेवाभावी संस्थेच्या सदस्या छाया मेश्राम यांनी महिलांना हळदी कुंकू लावून भेट वस्तू दिल्यात.यामध्ये जवळ पास ४० महिलांना हळदी कुंकूवाचा प्रेरणादायी लाभ मिळाला.कार्यक्रमात सहभागी झालेले प्रमुख लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पालघर जिल्हा अध्यक्ष जे पी करोतिया, ,संघटना उपाध्यक्ष संतोष राणे,जिल्हा सचिव संतोष घरत ,जिल्हा सदस्य प्रशांत करोतिया, पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आणि आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मेश्राम, आधार सेवाभावी संस्थेच्या सदस्या छाया मेश्राम, नितेंद्र मेश्राम,सुनयना मेश्राम, धिरेंद्र मेश्राम,जयवंत मेस्त्री,सुनीता मेस्त्री,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

