जल जीवन मिशन स्तर 3 चे प्रशिक्षण हे पुढील 30 वर्ष नियोजनासाठी खुप महत्वाचे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी- भरत कोसोदे
![]()

जल जीवन मिशन स्तर 3 चे प्रशिक्षण हे पुढील 30 वर्ष नियोजनासाठी खुप महत्वाचे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे
मा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समिती अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी ) यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात केआरसी म्हणून अमळनेर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधून सरपंच, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष व सदस्य , सचिवआशावर्कर, पाणी पुरवठा कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी ग्रामसेवक असे एकुण एका ग्रामपंचायत मधुन पाच व्यक्ती यांना सदर प्रशिक्षण देण्यात आले तसेच जळगाव जिल्हात सर्व ग्रामपंचायत यांना देखील प्रशिक्षण देण्यात आले. एकुण 10 बॅच मध्ये अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात आले त्या प्रसंगी कार्यक्रम साठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री भरत कोसोदे , मा.श्री.सुशांत पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर मा.श्री.सुरेश कठाले विस्तार अधिकारी पंचायत समिती अमळनेर,जिल्हा क्षमता बांधणी तंज्ञ मा.श्री मनोहर सोनवणे मा. श्री.मनोहर मोरे, मा.श्री. पांडुरंग कांबळे सीआरसी पंचायत समिती अमळनेर,राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.भुपेन्द्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण घेण्यात आले
मा. श्री.भरत कोसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांनी मार्गदर्शनपर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांना हे प्रशिक्षण आपल्याला पुढील 30 वर्षे साठी देखभाल व दुरुस्ती विषयाचे असल्याने खुप महत्वाचे आहे कारण आपल्या प्रत्येक गावात आपण प्रशिक्षण घेऊन आपल्याला गावात गावकरी यांना देखील आपल्या मार्फत टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात यावं जल जीवन मिशन कार्यक्रमाध्ये मनुष्य ,पाळीव प्राणी , पशु पक्षी या सर्वांचा विचार केला आहे जल जीवन मिशन चे प्रशिक्षण घेऊन झाल्यावर गावात याची अमलबजावणी करावी म्हणजे आपण प्रत्येकाने गावात प्रत्येक वार्ड निहाय जल जीवन मिशन संदर्भात बैठका घेऊन त्या संदर्भात जनजागृती करावी म्हणजे आपले गाव पाण्या संदर्भात कायम स्वरूपी पाणी टंचाई पासुन मुक्त होईल असा हा कार्यक्रम आहे या संदर्भात प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या गावात जल जीवन मिशन चे मार्गदर्शन करावे असे सरपंच व ग्रामसेवक यांच्या शिवाय गावाचा विकास होऊ शकत नाही म्हणून त्यांना ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी देखील राजकारण नकरता त्यांना सहकार्य करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तरच गावाचा विकास होईल असे देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री भरत कोसोदे यांनी सांगितले त्यामुळे प्रशिक्षणाची खुप गरज आहे असे देखील सांगितले सदर प्रशिक्षणात अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे पाच प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले तसेच मान्यवर यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थी यांना बॅग , पाणी बोटल ,नोट पॅड , पेन, प्रमाणपत्र सर्व प्रशिक्षण संपल्यावर प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आले.
सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव अंकित साहेब, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जळगाव मा. श्री. भारत कोसोदे गटविकास अधिकारी अमळनेर सुशांत पाटील, क्षमता बांधणी तंज्ञ मनोहर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भूपेंद्र महाले यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास संस्थे मार्फत सदर प्रशिक्षण घेण्यात आले या प्रसंगी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी तंज्ञ प्रशिक्षक दिनेश पाटील , सुरेश महाले , ज्योत्स्ना पाटील , ज्योती पाटील, सुशील केदारे, राष्ट्रविकास संस्थेचे सचिव श्री. तुषार पाटील या दरम्यान प्रशिक्षण देत आहेत या वेळेस संस्थेचे संचालक रागिणी महाले तसेच संस्थेचे प्रतिनिधी नयना चौधरी,महेश माकडे, दिलीप पाटील, स्वप्नील पाटील, सीमा महाजन, अमोला सुर्यवंशी,निलेश पाटील, राहुल सूर्यवंशी, रोहन पाटील, कुणाल पाटील, भाग्यश्री गोसावी हे सदर प्रशिक्षणाचे नियोजन करीत आहे.


