1 min read

स्वप्नील पाटील यांची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड

Loading

स्वप्नील पाटील यांची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड

मराठी माध्यमात शिक्षण घेत युपीएससीत भरारी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पातोंडा ता.अमळनेर येथील रहिवाशी रमेश देवाजी बिरारी यांचे नातू व पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डी के पाटील यांचा मुलगा स्वप्नील पाटील यांनी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) व केंद्रीय सचिवालय मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून केंद्रीय सचिवालय येथे अधिकारी पदावर निवड करण्यात आली आहे.
मराठी माध्यमातून शिक्षण घेत युपीएससी परीक्षेत आपला झेंडा रोवत एक नवीन आदर्श त्यांनी मराठी माध्यमातून शिकणा-या विद्यार्थ्यांसमोर घालून दिला. स्वप्निल याने प्राथमिक शिक्षण पातोंडा येथील जिल्हा परीषद शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण विवेकानंद शाळेतुन तर उच्च माध्यमिक शिक्षण दादासाहेब डाॅ सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा येथून येथून पूर्ण केले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण बीएसस्सी (भौतिकशास्त्र) फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून पुर्ण केले आहे. नियुक्ती दरम्यान सहा महिने प्रशिक्षण झाल्यावर मूळ पदावर नेमणूक होणार असल्याचे स्वप्नील पाटील यांनी प्रतिनीधीशी बोलतांना सांगितले.
स्वप्निलची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवडीची बातमी समजल्यावर आई , वडिल स्वप्निल व बहिण प्रतिक्षा यांच्यावर अभिनंदनाचा एकच वर्षाव सुरू झाला. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड संदिप पाटील , सचिव डाॅ स्मिताताई पाटील , दादासाहेब सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी. ए. सुर्यवंशी , उपप्राचार्य एस. पी. पाटील , पर्यवेक्षक ए. एन. बोरसे , उपशिक्षक अतुल पाटील, कपीलजी पवार सह आयुक्त आदिवासी विकास विभाग , प्रदिप शिंगाणे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व्हि सी पाटील , जि.प. शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील व राजेंद्र बागूल , पातोंडा सरपंच प्रतिभा शिंदे , माजी सरपंच भरत बिरारी , उपसरपंच दिलीप बोरसे , विकास मंचचे विलास चव्हाण , प्रा भुषण बिरारी ,महेंद्र पाटील सर , उमेश पाटील , पातोंडा ग्रामस्थ , चोपडा येथील पवार नगर व अनंत नगरचे ग्रामस्थ आदींनी भ्रमणध्वनी द्वारे व प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

बाईट –
” माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातुन झाले आहे. इयत्ता नववीपासूनच मला स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण झाली होती. पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत मागील सहावर्षांपासून मी केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत होतो. युपीएससी मार्फत तिन वेळा मुलाखती पर्यंत पोहचलो होतो. परंतू थोड्याफार फरकाने मेरीट प्रत्येक वेळा हुलकावणी देत होते. अपयशात आई वडील खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असल्यामुळे मला कधीही नैराश्य आले नाही. यानंतर देखील उच्चतम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.” – स्वप्निल पाटील

फोटो – चि. स्वप्निल यास पेढा भरवून आनंद व्यक्त करतांना आई सरला पाटील , वडील ज्ञानेश्वर पाटील व बहिण प्रतिक्षा पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *