विद्यार्थी क्षमता ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा-
![]()
विद्यार्थी क्षमता ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा-
अमळनेर तालुका विज्ञान मंडळ कार्याध्यक्ष विज्ञान शिक्षक डि के पाटील यांचे प्रतिपादन


ज्ञानदा सायन्स क्लासेस अमळनेर मध्ये विज्ञान प्रदर्शना सोबत विज्ञान दिन
उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शालेय शिक्षण घेतानाचं विज्ञानाची गोडी लागावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, सृजनशीलता वाढावी या हेतूने राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन भरविण्यात येते. विज्ञान दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा असे विज्ञान दिनानिमित्त अमळनेर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेस मध्ये विज्ञान प्रदर्शन तसेच इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प मॉडेल आयोजित करण्यात आले, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बालवैज्ञानिक गुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर तालुका विज्ञान मंडळ कार्याध्यक्ष व साने गुरुजी हायस्कूल चे विज्ञान शिक्षक श्री. डि. के. पाटील सर यांनी आपले अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन केले
व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साने गुरुजी कन्या हायस्कूल चे विज्ञान शिक्षक श्री. दिपक महाजन सर होते. विज्ञान प्रदर्शन चे परीक्षक म्हणून श्री. दिपक महाजन सर आणि श्री. डि के पाटील सर यांनी उत्कृष्ट परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदा क्लासेसची विद्यार्थीनी कु.पुजा पाटील तसेच आभार प्रदर्शन ज्ञानदा क्लासची विद्यार्थीनी कु. रोशनी पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदा क्लासेस चे संचालक श्री. धिरज पवार सर आणि सौ.स्वाती पाटील मॅडम परीश्रम घेतले. विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचा निकाल मोठा गट – प्रथम क्रमांक चि. यश सोनवणे (इयत्ता ८वी), द्वितीय क्रमांक कु. गिता पाटील (इयत्ता ९वी), तृतीय क्रमांक चि. प्रितेश महाजन (इयत्ता ९वी), तसेच उत्तेजनार्थ चि. पूर्वश पाटील (इयत्ता ९वी) आणि लहान गट – प्रथम चि. जयेश पाटील (इयत्ता ६वी) , द्वितीय क्रमांक महेश सांगोळे (इयत्ता ६वी) ,तृतीय क्रमांक वैष्णवी हिरे (इयत्ता ७वी) तसेच उत्तेजनार्थ आयुष पाटील (इयत्ता ६वी) यांनी बक्षिसे पटकावली. इतर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली .कार्यक्रमाला प्रा.श्री. हिरालाल पाटील सर ,अमळनेर पी. टी.ए. अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब मगर सर, अहिरराव सर, स्वाती पाटील मॅडम, पालक वर्ग आणि तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

