1 min read

शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल:

Loading

शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल:

तीन दिवसीय नववी ते बारावी प्रशिक्षण समारोपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यानुसार अपेक्षित क्षमता कौशल्य व ज्ञान शिक्षकांमध्ये विकसित होऊन त्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांमध्ये सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होणे गरजेचे आहे.. त्यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे म्हणून शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल:
असे प्रतिपादन प्रताप हायस्कूल अमळनेर येथे तीन दिवसीय नववी ते बारावी प्रशिक्षण समारोप प्रसंगी
अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी
केले…
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील पुढे म्हणाले की वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात ‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण प्रचलित आहे.त्या पद्धतीने बालकांचा क्षमता कौशल्याचा या प्रशिक्षणाने विकास करता येणार आहे.. शिक्षकांनी अध्यापनात विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा असे या प्रशिक्षण वर्गाचा उद्देश आहे..
शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणात १२ विषयांचा समावेश होता त्यामध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, एनसीएफ क्रॉस कटिंग, कुमारवयीन मुलांचे भाव विश्व उलगडताना, क्षमता आधारित मूल्यांकन व शाळा स्तर मूल्यांकन, माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग, कृती संशोधन व नवोपक्रम अनुभवजन्य व
खेळधारित अध्यापनशास्त्र, यांचा समावेश आहे या संदर्भात तिन दिवसीय
प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक निरंजन पेंढारे (बी बी.ठाकरे हायस्कूल वावडे) प्रमिला अडकमोल, भाग्यश्री वानखेडे, सुवास खान्जोळकर, संजय सैदाणे,काझी
असलमोद्दीन अमिरोद्दीन,किरण सनेर,जे.एम.पाटील, दिनेश निघोट यांनी सविस्तर मार्गदर्शन केले..
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे स्वागत तंज्ञ मार्गदर्शक काझी असलमोद्दीन अमिरोद्दीन यांनी केले..
सदर प्रशिक्षण वर्गासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ अनिल झोपे,
प्रशिक्षण समन्वयक डॉ चंद्रकांत साळुंखे डॉ भावसार मँडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रशिक्षण वर्गासाठी तालुक्यातील
नववी ते बारावी शिकवणाऱ्या शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहकार्य देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील,अमोल पाटील, किशोर पाटील, हंसराज पाटील
व पंचायत समिती शिक्षण विभागातील
विशेष शिक्षक व कर्मचारी यांनी मेहनत घेतली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *